सौजन्य फोटो - सोशल मिडीया
सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या उच्चशिक्षित पायलने अशा प्रकारे टोकाचं पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर पायलच्या कुटुंबीयांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना गंभीर आरोप केले आहेत. “माझी मुलगी गिळली, आमच्या काळजाचा तुकडा हिरावला,” अशा शब्दांत पायलच्या वडिलांनी आपला आक्रोश व्यक्त केला. लग्नानंतर दुसऱ्या दिवसापासूनच सासरच्या मंडळींकडून पायलचा छळ सुरू झाल्याचा दावा वडिलांनी केला. पाहुण्यांसाठी हॉटेल बूक केले नाही आणि चांदीच्या वस्तू दिल्या नाहीत, या क्षुल्लक कारणांवरून तिला सतत लक्ष्य केले जात होते.
कुटुंबातील एका महिलेने दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व वाद संपत्तीच्या कारणावरून टोकदार झाला होता. वडीलांच्या संपत्तीत हिस्सा घेण्यासाठी आणि सातारा रस्त्यावरील प्लॉट स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी पायलवर प्रचंड दबाव टाकला जात होता. मृत्यूच्या दोन दिवस आधीच सासूने पायलसोबत मोठा वाद घातला होता. “पायल अशी टोकाचं पाऊल उचलणारी मुलगी नव्हती, सासू आणि नवऱ्यानेच ही परिस्थिती निर्माण केली,” असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच नवऱ्याने पायलचे केस पकडून तिला पायऱ्यांवरून खाली ओढत नेले होते आणि बेदम मारहाण केली होती, अशी माहितीही समोर आली आहे. नवरा पूर्णपणे आईच्या आहारी गेला होता आणि आई सांगेल तसेच करत होता, असे सांगत कुटुंबीयांनी झांबरे कुटुंबावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Ans: या प्रकरणी मृत पायलचा पती अक्षय झांबरे याच्यासह तिची सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला अटक झाली आहे.
Ans: सातारा रस्त्यावरील एक प्लॉट पायलच्या वडिलांकडून तिच्या नावावर किंवा सासरच्यांच्या नावावर करून घेण्यासाठी सासरच्या मंडळींकडून सतत दबाव टाकला जात होता आणि त्यातूनच हा वाद टोकाला गेला होता.
Ans: पती अक्षय झांबरेला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर सासू, सासरे आणि नणंद हे सर्वजण सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.






