Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Punjab Crime: व्यापाऱ्याचा खून! कारमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह; घरकाम करणारीच ठरली कटामागे

पंजाबमधील नवांशहरमध्ये व्यापारी रवी सोबती यांचा खून करून मृतदेह कारमध्ये जाळण्यात आला. तपासात घरकाम करणारी सोनम आणि तिचा दाजी कटामागे असल्याचं उघड झालं असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 22, 2025 | 08:44 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • व्यापारी रवी सोबती यांचा ब्लाइंड मर्डर; कारमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह आढळला
  • घरकाम करणारी सोनम आणि तिचा दाजी सुरजीत सिंग हत्येच्या कटामागे
  • पुरावे नष्ट करण्यासाठी कार पेटवून अपघाताचा बनाव करण्याचा प्रयत्न
पंजाब: पंजाबमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका व्यापाऱ्याची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर पुरावा नष्ठ करण्यासाठी पेट्रोल टाकून त्यांची गाडी देखील जाळण्यात आली. या घटनेमागील धक्कादायक बाब म्हणजे, या काटामागील सूत्रधार घरकाम करणारी मोलकरीण आणि तिचा दाजी असल्याचे समोर आलं आहे. ही घटना पंजाबमधील नवांशहर (शहीद भगतसिंग नगर) येथे घडली आहे. मृतकाचे नाव रवी सोबती असे आहे. ते नवांशहर चेंबर ऑफ कॉमर्सचे व्हाइस प्रेसिडेंट आणि किराणा दुकानदार होते. तर आरोपी मोलकरणीचे नाव सोनम आणि तिच्या दाजीचे नाव सुरजीत सिंग उर्फ जस्सी असे आहे.

Pune Crime : पुण्यात किरकोळ वादातून दोघांवर खुनी हल्ला; नेमकं काय घडलं?

काय घडलं नेमकं?

१२ डिसेंबर २०२५ रोजी मृतक रवी सोबती हा घरी परतला नाही. रात्री ९ वाजताच्या दरम्यान मुलगा सुमित सोबती याने नवांशहरमधील शहर पोलीस ठाण्यात वडील बेपत्ता असल्याची तक्रार दिली. तक्रारीनंतर, पोलिसांनी तात्काळ रवी सोबतीच्या शोधला लागले. पोलिसांनी आधी त्याचा मोबाईल फोनचं लोकेशन शोधलं. बलाचौर येथे त्याचा शेवटचा लोकेशन आढळलं. पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने बलाचौर पोलिसांशी संपर्क साधला आणि घटनास्थळी एक पथक पाठवलं. तर पोलिसांना तेथील दृश्य पाहून धक्का बसला. तिथे रवी सोबतीचा अर्धवट जळालेला मृतदेह त्याच्या गाडीत आढळला. मुलाच्या जबाबावरून त्या रात्री पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपासाला लागले.

सर्वात आधी अनेक पथके तयार करण्यात आली. टेक्निकल, वैज्ञानिक आणि ह्यूमन इंटेलिजन्सच्या आधारे तपास करण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. एवढेच नाही तर तपासादरम्यान, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल देखील जप्त करण्यात आली. आरोपी रवी सोबतीचा घरी काम करणारी मोलकरीण आणि तिचा दाजी निघाला.

कसा रचला कट?

रवी सोबतीच्या घरी काम करणारी सोनमवर मृतक रवी तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचं आपल्या दाजीला सांगितलं. घटनेच्या दोन दिवसांपूर्वी, सुरजीत सिंगने रवी सोबतीला याबाबत जाब विचारला आणि त्यामुळे त्यांच्यात भांडण झालं. रवीने त्याचं घर सोडून देण्याची धमकी दिली आणि त्यानंतर शिवीगाळ सुद्धा केली. याच वादातून संतापलेल्या सूरजीत सिंगने रवीच्या हत्येचा कट रचला असे तपासात समोर आले.

कशी केली हत्या?

आरोपी सुरजितने सोनमला दुपारी घरी परतण्यास सांगितले. संध्याकाळी रवी सोबती तिला सोबत नेण्यासाठी आल्यानंतर त्याला रेल्वे क्रॉसिंग 3 जवळील अंडरपासजवळील एका निर्जन भागात नेण्यात येईल, अशी योजना आखण्यात आली. योजनेनुसार, त्याच्या साथीदारांच्या मदतीने रवी सोबतीची हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह बलाचौर येथे नेण्यात आला आणि हत्येचा संशय टाळण्याच्या दृष्टीने अपघात दाखवण्यासाठी पीडित रवीच्या गाडीवर पेट्रोल ओतून ती जाळून टाकण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपींनाला अटक केली असून त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

Satana Crime: बनावट ५०० रुपयांच्या नोटांचा सुळसुळाट, सटाण्यात ३० हजार रुपयांहून अधिक नोटा जप्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: रवी सोबती यांची हत्या कशी करण्यात आली?

    Ans: आरोपींनी निर्जन ठिकाणी नेऊन त्यांची हत्या केली व नंतर मृतदेह कारमध्ये ठेवून गाडी पेटवली.

  • Que: या हत्येमागचं कारण काय होतं?

    Ans: घरकाम करणाऱ्या सोनमने लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर तिच्या दाजीनं सूडातून हत्येचा कट रचला.

  • Que: पोलिसांनी आरोपींना कसं पकडलं?

    Ans: मोबाईल लोकेशन, तांत्रिक पुरावे आणि चौकशीतून पोलिसांनी अवघ्या एका दिवसात आरोपींना अटक केली.

Web Title: Punjab crimebusinessman murdered partially burnt body found in the car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 08:44 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Satana Crime: बनावट ५०० रुपयांच्या नोटांचा सुळसुळाट, सटाण्यात ३० हजार रुपयांहून अधिक नोटा जप्त
1

Satana Crime: बनावट ५०० रुपयांच्या नोटांचा सुळसुळाट, सटाण्यात ३० हजार रुपयांहून अधिक नोटा जप्त

MP Crime : सून आणि सासरे एकत्र करत होते…, नातवाने असं काही पाहिलं की रागाच्या भरात उचललं टोकाचं पाऊल
2

MP Crime : सून आणि सासरे एकत्र करत होते…, नातवाने असं काही पाहिलं की रागाच्या भरात उचललं टोकाचं पाऊल

Pune Crime: एकतर्फी प्रेमातून विवाहितेच्या पतीची निर्घृण हत्या; सासवड येथील घटना; आरोपी अटकेत
3

Pune Crime: एकतर्फी प्रेमातून विवाहितेच्या पतीची निर्घृण हत्या; सासवड येथील घटना; आरोपी अटकेत

Uttarpradesh Crime: आठवीच्या मुलीची छेडछाड; आरोपी अल्पवयीन, पोलिसांनी थेट चार मुलांच्या आईलाच केली अटक!
4

Uttarpradesh Crime: आठवीच्या मुलीची छेडछाड; आरोपी अल्पवयीन, पोलिसांनी थेट चार मुलांच्या आईलाच केली अटक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.