पंजाब: पंजाबमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एक तरुण आपल्या विवाहित प्रेयसीला घेऊन लॉजवर गेला होता. तेथे या दोघांमध्ये शरीरसंबंध झाले आणि त्यानंतर दोघांमध्ये वाद झाले. हा वाद एवढा विकोपला की प्रेयसीने प्रियकराच्या थेट गुप्तांगावर वार केला. प्रियकराने स्वतःच्या बचावासाठी प्रेयसीवर हल्ला चढवला. त्याने तिला एवढी मारहाण केली की त्यात तिचा मृत्यू झाला. हि घटना पंजाबच्या लुधियाना येथे घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. नेमकं प्रकरण काय आहे, जाणून घ्या.
काय घडलं नेमकं?
१० डिसेंबर बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अमित आणि त्याची प्रेयसी रेखा लुधियानातील इंडो अमेरिकन हॉटेलमधील रूम नंबर २०३ मध्ये गेले होते. अमितने ओळखपत्रे दाखवून खोली बुक केली होती. अमितची प्रेयसी रेखा ही विवाहित होती. तिला दोन मुले आहेत. ती पतीपासून वेगळी राहत होती. ती नर्सिंगचे काम करत होती. तर अमित हा अविवाहित असून तो एम्ब्रॉयडरीचे काम करतो. त्याच्याजवळ नेहमी एक कटर तो ठेवत होता.
त्या लॉजवर अमित आणि रेखा हे दोघेही शरिर संबंधासाठी गेले होते. शरीर संबंध सुरु असतांना रेखाने अमितकडे लग्नाचा विषय काढला होता. अमित लग्न करण्याचे टाळत होता. अमितला तिच्यासोबत लग्न करायचे नव्हते. याचवेळी अमितने एक महत्वाची गोष्ट तिला सांगितली. त्याने रेखाला सांगितले की आपला साखरपुडा झाला आहे. त्या तरुणीशी आपण लग्न करणार आहोत. कुटुंबियांच्या सांगण्यानुसार लग्न करावे लागणार आहे. आपल्यावर दबाव आहे असे त्याने रेखाला सांगितले. मात्र रेखा त्याच काहीच ऐकण्याच्या तयारीत नव्हती.
हे ऐकून रेखाला प्रचंड संतापली. तिथे अमितला शिवीगाळ करायला सुरु केले. रागाच्या भरात तिने शेजारी ठेवलेला कटर उचलला आणि अमितच्या गुप्तांगावर वार केला. त्यात अमित गंभीर जखमी झाला. दुसऱ्यांदा वार करण्याच्या प्रयत्नात अमितने रेखाचा हात धरत स्वतःचा बचाव केला. त्याने तिच्या चेहऱ्यावर ठोसे मारण्यास सुरुवात केली. तिच्या नाकातोंडातून रक्तस्त्राव सुरु झाला. त्यानंतर अमितने तिला जमिनीवर आपटले. तिचा गळा दाबला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.
कर्मचाऱ्यांना संशय आणि…
हत्येनंतर हॉटेलमधून अमित घाईघाईने पँट घालून खोलीतून बाहेर पडला. हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्याला विचारले तेव्हा, त्याने जेवण आणायला जात आहे असे सांगितले. मात्र त्याला रक्तस्त्राव होत असल्याने कर्मचारयांना दिसून आले आणि त्याची घाई पाहून कर्मचाऱ्यांना संशय आला. अमितला जखम झाल्याने तो थेट सीएमसी रुग्णालय गाठले. जिथून तो पुढील उपचारासाठी पीजीआयला रेफर करण्यात आले आहे. अमित हा बराच वेळ हॉटेलमध्ये परत आला नाही. त्यांनी रूम नंबर 203 मध्ये जाऊन पाहिलं तेव्हा बेडवर रेखाचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. हॉटेल कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अमितला अटक केली असून, पुढील कारवाई केली जात आहे.
Ans: लुधियानातील इंडो अमेरिकन हॉटेलमध्ये.
Ans: प्रियकराने लग्न नाकारल्यामुळे वाद झाला.
Ans: आरोपी प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.






