Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chattisgarh Crime: दारू पार्टीत ‘चकणा’साठी आंबे तोडण्यावरून वाद; अल्पवयीन मुलाची बेदम मारहाण करून हत्या, अपघाताचा बनाव फसला

छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यात दारू पार्टीदरम्यान चकणा म्हणून आंबे तोडून आणण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका अल्पवयीन मुलाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. आरोपींनी मृतदेह वडाच्या झाडाखाली टाकून अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 30, 2026 | 03:42 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • दारू पार्टीत किरकोळ वादातून अल्पवयीन मुलाची हत्या.
  • आरोपींनी मृतदेह लपवून अपघाताचा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
  • पोलिसांनी दोन आरोपी आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली.
छत्तीसगड: छत्तीसगड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चकणा म्हणून आंबे तोडून आणण्याच्या कार्नरवरून एका अल्पवयीन मुलाची तिघांनी बेदम मारहाण करत हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह एका वडाच्या झाडाखाली लपवून अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. ही घटना छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील ही घटना आहे.

‘आओ तुम्हें कुर्बानी दिखाते हैं’, ईदच्या दावतसाठी बोलावून पोटात खुपसला चाकू, आईने केली आरोपीच्या एनकाउंटरची मागणी

काय घडलं नेमकं?

25 मे रोजी सकाळी एका वडाच्या झाडाखाली एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान मृताच्या मोठ्या भावाने सांगितले की, 24 मे रोजी सकाळी गावातील ऋषी डनसेना हा त्याच्या लहान भावाला कामासाठी सोबत घेऊन गेला होता. मात्र, तो रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह रक्ताळलेल्या अवस्थेत आढळून आला.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मुलाची हत्या झाल्याचे स्पष्ट. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. संशयाच्या आधारे पोलिसांनी ऋषी डनसेनाची चौकशी केली, तेव्हा त्याने सांगितले की तो मृत मुलाला त्याचे मित्र चंद्रशेखर उर्फ चंदा, रघुनाथ उर्फ रघु सिंग आणि एका अल्पवयीन मुलाजवळ सोडून कामावर गेला होता. दरम्यान, ऋषीने चंद्रशेखरला फोन केला असता त्याला फोनवर मारहाण आणि ओरडण्याचा आवाज ऐकू आला होता, ज्यावर त्याने वाद मिटवण्यास सांगितले होते.

Chandrapur Crime: आईच बनली सौदागर? चंद्रपुरात दोन मुलांची विक्री केल्याचा आरोप, नवजात बाळालाही विकण्याचा प्रयत्न उघड

या माहितीवरून पोलिसांनी तिन्ही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची स्वतंत्रपणे कसून चौकशी केली. या चौकशीत आरोपींनी आपला गुन्हा कबूल करत दारू पार्टीदरम्यान चकणा म्हणून आंबे तोडून आणण्यावरून वाद झाल्याचे सांगितले. हा वाद विकोपाला गेल्यानंतर तिन्ही आरोपींनी मिळून त्या अल्पवयीन मुलाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणी दरम्यान तो शेताच्या बांधावरून घसरून तलावाच्या बाजूला पडला आणि गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेह उचलून वडाच्या झाडाखाली आणून ठेवला, जेणेकरून हा अपघात वाटावा.

आरोपी अटकेत

पोलिसांनी या प्रकरणात चंद्रशेखर उर्फ चंदा डनसेना, रघुसिंग उर्फ रघुनाथ राठिया आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली असून, घटनास्थळाची पुनर्रचना करून आरोपींचे कपडे जप्त केले आहेत. न्यायालयाने आरोपींची रवानगी तुरुंगात केली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या कशामुळे झाली?

    Ans: दारू पार्टीदरम्यान चकणा म्हणून आंबे तोडून आणण्याच्या कारणावरून वाद झाला आणि त्यातून हत्या करण्यात आली.

  • Que: आरोपींनी गुन्हा लपवण्यासाठी काय केले?

    Ans: मृतदेह वडाच्या झाडाखाली ठेवून तो अपघात असल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला.

  • Que: पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी दोन प्रौढ आरोपी आणि एका अल्पवयीन मुलाला अटक करून न्यायालयात हजर केले आहे.

Web Title: Raigad crime case against aambe todanya for liquor party chakna underage mulachi was beaten to death an accident was made up and the crop was found

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 03:42 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.