ईदच्या दावतसाठी बोलावून पोटात खुपसला चाकू
आईने केली एनकाउंटरची मागणी
मुलाच्या मृत्यूनंतर सूर्याच्या आईने एका मुलाखतीत म्हटले की, “जसा माझ्या मुलाच्या पोटात चाकू घुपसला तसाच मी त्याच्या पोटातही चाकू घुपसून त्याच्या आतड्या बाहेर काढेन. आरोपीने फोन करुन बोलावलं होतं, आम्हाला नव्हतं माहित की तो बकदी ईदला चाकू घुपसेल. त्याचा एनकाउंटर व्हाययला हवा”.
मांस खायला दिला होता नकार
घटनेवेळी सूर्यासोबत जो मित्र उपस्थित होता त्याने सांगितले की, आरोपींनी आम्हाला ईद साजरा करण्यासाठी बोलावले आणि म्हटले की, या तुम्हाला कुर्बानी दाखवतो. आमचे आरोपीसोबत काही वैर नव्हते. आम्ही त्यांना सांगितले की, आम्ही मांस खात नाही. तो आम्हाला सोबत घेऊन जात होता आणि अशातच त्याने अचानक चाकू काढून सूर्याच्या पोटात घुपसला. मित्राने सांगितले की, यावेळी त्यांच्यासोबत ५-६ लोक उपस्थित होते. सूर्याला मारताच मित्र आयुष तिथून पळाला पण काही वेळाने तो परत आला. त्याने पाहिले की तिथे गर्दी जमली आहे आणि मग एका मुलाच्या मदतीने त्याने सूर्याला फोर्टिस हॉस्पिटलच्या एमरजेंसी वार्डमध्ये त्याला एडमिट केले. त्याने मागणी केली आहे की, “मित्राचा ज्या वेदनेने मृत्यू झाल्या त्याच वेदना आरोपीलाही झाल्या पाहिजेत”.
हिंदू संघटनांनी केला आक्रोश
दुसरीकडे या घटनेच आता हिंदू संघटनांनी आक्रोश केला असून हिंदू रक्षा दलाचे सदस्य खोडा येथून पळून जाण्याचा इशाराही देत आहेत. VHP खोडा अध्यक्ष संजय मिश्रा यांनी म्हटले की, खोड्यात अत्याचार खूप वाढला आहे. त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे आरोपीच्या एनकाउंटरची मागणी केली.
संतापजनक! केजमध्ये 13 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; तोंड, हात रुमालाने बांधले अन्…
आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली
विनीत राजपूत यांच्या तक्रारीवरुन गाझियाबाद पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एफआएआरनुसार, २८ मे रोजी दुपारी ०३.३० वाजताच्या सुमारास खोडा पोलिस ठाण्याच्या परिसरात सदर घटना घडली. विनीत राजपूत यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा भाऊ सूर्या आणि मित्र आयुष हे खोडा येथील नवनीत विहारमधून जात असताना रस्त्यात त्यांची आरोपीशी गाठ पडली. वाद आणि शिवीगाळ झाल्यानंतर, त्याने सूर्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या पोटावर चाकूने वार केले. पोलिसांनी आता आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.






