महाडच्या MIDC मध्ये अंमली पदार्थांचा साठा गुन्हेशाखेकड़ून जप्त करण्यात आलेला आहे. एका रासायनिक युनिटवर छापा टाकून पोलिस व अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (NCB) यांच्या संयुक्त कारवाईतून जवळपास 89 कोटी किंमतीचा किटामाईन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाड MIDC सीतील रोहन केमिकल्स या बंद कंपनीच्या प्रांगणात सुरू असलेल्या बेकायदेशीर रसायन प्रक्रियेवर बुधवार 23 जुलै 2025 रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. याठिकाणाहून ३४ किलो किटामाईन पावडर आणि १३ किलो लिक्विड किटामाईन असा एकूण साठा जप्त करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
महाड MIDC परिसरात ही कंपनी कित्येक वर्षांपासून बंद होती. या बंद पडलेल्या कंपनीत काहीतरी बेकायदेशीर काम सुरु असल्याचा संशय होता. यादरम्यान अंमली पदार्थ विरोधी पथकाला याबाबत सुगावा लागला. त्यानंतर पथाकाने तपास जारी केला. त्यावेळी कंपनीच्या आत मोठ्या प्रमाणावर मेफेड्रोन तयार केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.सर्च ऑपरेशन दरम्यान संशयित रसायने, उपकरणे आणि अर्धवट तयार अंमली पदार्थही सापडले. सुरुवातीच्या अंदाजानुसार हा साठा सुमारे ३० कोटी रुपये किंमतीचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
या युनिटचा वापर कायदेशीर उत्पादनाऐवजी अंमली पदार्थ निर्मितीसाठी केला जात असल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे. या बेकायदेशीर व्यवहारात अनेक व्यक्ती तसेच लहान रासायनिक युनिट्स सामील असल्याचा संशय असून, सध्या काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामध्ये मच्छिंद्र तुकाराम भोसले , सुशांत संतोष पाटील शुभम सदाशिव सुतार, रोहन प्रभाकर गवंंस यांचा समावेश आहे. हे सगळे संशयित महाड, कोल्हापूर आणि मुंबई इथले असल्याचं म्हटलं आहे.
मुंबईकरांचा लोकल प्रवास आता अधिक सुरक्षित होणार, पश्चिम रेल्वेवर १२,४४६ व्हिडीओ सव्हॅलन्स सिस्टीम
या प्रकरणी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा १९८५ (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला संपूर्ण गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पथकाकडून माहिती गोळा केली जात आहे.या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर साखळीवर मोठा आघात झाल्याचे बोलले जात असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलीस विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
बंद पडलेली कंपनी कोणाच्या नावावर होती ? की ही कंपनीच बोगस होती ? तसंच तपासात आढळलेल्या रसायनांच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली जात आहे. एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यासगळ्या गैरप्राकारमुळे औद्योगिक क्षेत्रात कायदेशीर व्यवसायाऐवजी बेकायदेशीर धंद्यांचे प्रमाण अधिक वाढत जात असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.