धाराशिवमध्ये रक्षकच भक्षक बनल्याचे समोर आले आहे. धाराशीव येथील एका पोलीस निरीक्षकाने पिस्तुलाचा धाक दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. पीडित महिला ही मूळ बीडची आहे. बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडितेच्या तक्रारीनंतर खळबळ उडाली आहे.
आधी डोक्यात फावडा घातला, नंतर गळा आवळला आणि…..; पत्नीच्या प्रियकराने केली पतीची हत्या
पीडितेने तक्रारीत काय म्हंटले आहे
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, धाराशिव येथील सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांची ओळख विवाहितेशी २०१३ मध्ये झाली, जेव्हा शिंदे बीड पोलीस दलात कार्यरत होता. ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांनतर शिंदेने पिस्तुलाचा धाक दाखवत विवाहितेवर अत्याचार करत स्वतःसोबत राहण्यास भाग पाडले. बीडमधून शिंदेची धाराशिवला बदली झाली तेव्हा सुद्धा त्याने वारंवार पिस्तुलाच्या धाकावर अत्याचार केला. शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने धाराशिव येथे सोबत राहण्यास नकार दिल्यानंतर हा प्रकार समोर आला.
नेमकं काय घडलं?
पीडित महिला आणि रवींद्र शिंदे यांची घरे शेजारी असल्याने त्यांची जुनीच ओळख होती. रवींद्र शिंदे याची पोलीस खात्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाल्यानंतर तो जिल्ह्याबाहेर गेला. मात्र, पीडितेशी कायम संपर्क करण्याचा प्रयत्न तो करत होता. सुरुवातीला २०१३ मध्ये रात्रीच्या वेळी बळजबरीने घरात घुसून त्याने बंदुकीचा धाक दाखवून अत्याचार केला आणि पीडितेच्या नग्न व्हिडीओ आणि फोटो देखील काढले. या बद्दल कोणाला सांगितले तर तुझ्या पतीला खोट्या गुन्ह्यात अडकण्याची धमकीही त्याने दिली असल्याचे फिर्यादीने म्हंटले आहे.
एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या पोलिस अधिकाऱ्याने वारंवार अत्याचार केल्यानंतर पिडीता गर्भवती राहली होती. त्याने त्या महिलेचा जबरदस्ती गर्भपात करायला लावला. त्यांनतर त्याने १जून रोजी पुन्हा तो पीडितेच्या घरात शिरला आणि तिच्यावर जबरदस्ती केली. त्यांनतर १ जुलैला त्याने तुला व तुझ्या कुटूंबाला जिवे मारण्याची आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचे शिवाजी नगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही आहे. पोलीस अधिकाऱ्यावरच अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
आधी डोक्यात फावडा घातला, नंतर… ; पत्नीच्या प्रियकराने केली पतीची हत्या
नवी मुंबई येथून एक हत्येची धक्कदायक घटना समोर आली आहे. पदवीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या २२ वर्षीय एका मुलाने प्रेम प्रकरणातून त्याच्या प्रेयसीच्या नवऱ्याचा डोक्यात फावडा घालून निर्घृण हत्या केली. ही घटना वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. दाम्पत्याला २ मुले देखील आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.