Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajasthan Crime: शेजारीणच्या घरात गेली अन् परत आलीच नाही…, 5 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या; धक्कादायक कारण समोर

राजस्थानातील जयपूरमध्ये पतीचे शेजारील महिलेशी संबंध असल्याच्या संशयातून एका महिलेने 5 वर्षीय चिमुरडीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतदेह ब्लँकेटमध्ये लपवून ठेवण्यात आला होता. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी महिलेला अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 16, 2026 | 01:17 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पतीच्या अनैतिक संबंधांच्या संशयातून चिमुरडीची हत्या केल्याचा आरोप.
  • मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून घरात लपवून ठेवला होता.
  • सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली.
राजस्थान: राजस्थानमधील जयपूर परिसरातून एक काळीज पिळवटून टाकणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पतीचे शेजारील महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका महिलेने अवघ्या 5 वर्षीय निष्पाप चिमुरडीचा गळा दाबून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. एवढंच नाही, तर या हत्येनंतर मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून लपवून ठेवण्यात आला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी अवघ्या 48 तासांत आरोपी महिलेला अटक केली आहे. घडलेली घटना शनिवारी (13 जून) रोजी घडली.

इंद्रायणी नदीत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; पीएमआरडीएच्या पथकाने वाचवले प्राण

काय घडलं नेमकं?

शनिवारी सकाळी या प्रकरणातील मृत मुलीचे वडील कामावर गेले होते. त्यांनंतर दुपारी १ च्या सुमारास त्यांची मुलगी बेपत्ता झाल्याचे त्यांच्या पत्नीने फोन करून सांगितले. कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु ती कुठेही न सापडल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. तपास सुरु असतांना पोलिसांना समजले की, ती चिमुरडी अनेकदा शेजारी राहणाऱ्या गुडिया देवी (30) हिच्या घरी खेळायला जात होती.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा ती मुलगी आरोपीच्या घरात जाताना दिसली. मात्र तिथून ती बाहेर निघालीच नाही. यावरून पोलिसांना गुडिया देवीवर संशय आला. पोलिसांनी गुडिया देवीच्या घराची झडती घेतली तेव्हा तिचा मृतदेह आढळून आला. तिचा मृतदे एका ब्लँकेटमध्ये गुंडाळून ठेवण्यात आले होते. जुंमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.

कशी केली हत्या?

13 जून रोजी जेव्हा ती चिमुरडी खेळता खेळता तिच्या घरी आली, तेव्हा आरोपीने तिला घरात कोंडले आणि तिचे तोंड दाबून तिची निर्घृण हत्या केली. यानंतर तिने मृतदेह ब्लँकेटमध्ये लपवून ठेवला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी रात्रीच्या अंधारात हा मृतदेह जवळच्या जंगलात फेकून देण्याची तिची योजना होती.

का केली हत्या?

गुडिया देवीचा पती अफरोज उर्फ फिरोज खान याच्याशी मुलीची आई फोनवर बोलते, असा संशय गुडिया देवीला होता. त्यातच पाणी भारण्यावरून नुकताच वाद झाला होता. त्यामुळे गुडिया देवी चिमुकलीच्या आईवर चिडून होती. पीडित मुलीच्या आईला आयुष्यभराचे दुःख देण्याच्या हेतूने आरोपी गुडिया देवी गेल्या काही दिवसांपासून कट रचत होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Beed Crime: लग्नाचे आमिष दाखवत शेतात नेले; तोंडाला रुमाल आणि दोन्ही हात घट्ट बांधून पाशवी अत्याचार

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपी महिलेचे नाव काय आहे?

    Ans: गुडिया देवी असे आरोपी महिलेचे नाव आहे.

  • Que: चिमुरडीचा मृतदेह कुठे सापडला?

    Ans: आरोपी महिलेच्या घरात ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला.

  • Que: आरोपीने हत्या का केल्याचा आरोप आहे?

    Ans: पतीचे पीडित मुलीच्या आईशी संबंध असल्याच्या संशयातून हत्या केल्याचा आरोप आहे.

Web Title: Rajasthan crime went to a neighbors house and never returned 5 year old girl brutally murdered shocking reason revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • crime
  • rajasthan
  • Rajasthan Crime

संबंधित बातम्या

Beed Crime: लग्नाचे आमिष दाखवत शेतात नेले; तोंडाला रुमाल आणि दोन्ही हात घट्ट बांधून पाशवी अत्याचार
1

Beed Crime: लग्नाचे आमिष दाखवत शेतात नेले; तोंडाला रुमाल आणि दोन्ही हात घट्ट बांधून पाशवी अत्याचार

Mumbai Crime: ‘CA’ नोकरीचे आमिष, लग्नाचे वचन अन् शोषण; मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप
2

Mumbai Crime: ‘CA’ नोकरीचे आमिष, लग्नाचे वचन अन् शोषण; मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप

Gadchiroli Crime: ‘तुझ्याशीच लग्न करेन’ म्हणत डॉक्टरकडून वारंवार लैंगिक शोषण, डॉक्टर अटकेत; आष्टीतील धक्कादायक प्रकार
3

Gadchiroli Crime: ‘तुझ्याशीच लग्न करेन’ म्हणत डॉक्टरकडून वारंवार लैंगिक शोषण, डॉक्टर अटकेत; आष्टीतील धक्कादायक प्रकार

Bhiwandi Accident: हृदयद्रावक! पार्किंगमध्ये खेळताना काळाचा घाला; सेप्टिक टँकमध्ये पडून 5 वर्षीय चिमुकल्याचा बळी
4

Bhiwandi Accident: हृदयद्रावक! पार्किंगमध्ये खेळताना काळाचा घाला; सेप्टिक टँकमध्ये पडून 5 वर्षीय चिमुकल्याचा बळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.