Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fake Ration Card Case: धक्कादायक! सीएम, डीसीएमचे शहरात बनले रेशनकार्ड; जलील यांच्या दाव्यानंतर गुन्हा दाखल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट पिवळे रेशनकार्ड तयार करण्यात आले आहे. याप्रकरणी प्रशासनाने चौकशी करून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 16, 2026 | 05:04 PM
Fake Ration Card Case: धक्कादायक! सीएम, डीसीएमचे शहरात बनले रेशनकार्ड (Photo Credit- X)

Fake Ration Card Case: धक्कादायक! सीएम, डीसीएमचे शहरात बनले रेशनकार्ड (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • धक्कादायक!
  • सीएम, डीसीएमचे शहरात बनले रेशनकार्ड
  • जलील यांच्या दाव्यानंतर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाने बनावट पिवळे रेशनकार्ड तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत संबंधित कार्ड माध्यमांसमोर सादर केल्यानंतर प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू केली. तपासात हे कार्ड पूर्णपणे बोगस असल्याचे निष्पन्न झाल्याने अन्नधान्य वितरण विभागाने सिटी चौक पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

इम्तियाज जलील यांनी केला होता गौप्यस्फोट

माजी खासदार इम्तियाज जलील यांनी १२ मार्च रोजी शहरातील अलंकार हॉटेल येथे पत्रकार परिषद घेऊन हे पिवळे रेशनकार्ड दाखवले. या कार्डावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव एकनाथ संभाजी शिंदे, (रा. आंबेडकरनगर, औरंगाबाद) असे नमूद करण्यात आले होते. तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावेही त्यात लिहिलेली असल्याचे दिसून आले. तसेच काडांवर कार्यालयाचे गोल शिक्के आणि सक्षम अधिकाऱ्याची स्वाक्षरी असल्याचे दर्शविण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने तात्काळ पडताळणी सुरू केली.

Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘खतरों के खिलाड़ी’ शोच्या नावाखाली 50 लाखांचा व्यवहार; पार्टीला बोलावून प्राध्यापकाची हत्या

ऑनलाईन तपासणीत हे रेशनकार्ड अस्तित्वातच नाही

अन्नधान्य वितरण विभागाने रेशनकार्डावर नमूद केलेल्या आधार क्रमांकाच्या आधारे ऑनलाईन प्रणालीमध्ये तपासणी केली. मात्र त्या तपासात असे कोणतेही रेशनकार्ड शासनाच्या नोंदीत नसल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय आंबेडकर नगर परिसरातील
संबंधित ड रजिस्टर (दप्तर) तपासले असता देखील या कार्डची कोणतीही नोंद आढळून आली नाही. त्यामुळे सदर कार्ड पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शहरातून कोणाचे ही रेशनकार्ड काढता येते असे दिसून आले.

अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा

शासकीय योजनांचा लाभ मिळविण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने हे बनावट रेशनकार्ड तयार केल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. या प्रकरणी अन्नधान्य वितरण अधिकारी भारती भास्करराव वाकोडे (४०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिटी चौक पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास निरीक्षक श्रीनिवास रोयलावार करत आहेत.

हस्तलिखित कार्डामुळे संशय

राज्य शासनाने मागील दोन वर्षांपासून हस्तलिखित शिधापत्रिका देण्याची पद्धत बंद केली आहे. सध्या सर्व रेशनकार्ड केवळ ऑनलाईन प्रणालीद्वारे संगणकावरून प्रिंट करून दिली जातात. मात्र या प्रकरणातील कार्ड पूर्णपणे हाताने लिहिलेले असून त्यावर बनावट शिक्के व स्वाक्षऱ्या असल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे प्रशासकीय चौकशीत हा बनावटपणा उघड झाला.

Crime News: संभाजीनगरमध्ये डॉक्टरला 5 लाखांची मागणी; पोलिसांकडून ‘फिल्मी’ स्टाईलने भांडाफोड, माजी नगरसेविकेसह 6 जणांना अटक

Web Title: Ration cards issued to cm and dcm in the city case registered following jalils allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Eknath Shinde
  • Imtiaz Jaleel
  • Ration card News

संबंधित बातम्या

तू शहर सोडून जा, नाहीतर तुला…; संभाजीनगरमध्ये जीम ट्रेनर तरुणीचा 7 महिने पाठलाग
1

तू शहर सोडून जा, नाहीतर तुला…; संभाजीनगरमध्ये जीम ट्रेनर तरुणीचा 7 महिने पाठलाग

तक्रार दिल्याचा राग, दुकानदार महिलेला 4 दिवस घराबाहेर पडू दिले नाही; चाकू दाखवत दिल्या धमक्या
2

तक्रार दिल्याचा राग, दुकानदार महिलेला 4 दिवस घराबाहेर पडू दिले नाही; चाकू दाखवत दिल्या धमक्या

‘मी काँग्रेसचा…’, शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार यांनी सोडले मौन, म्हणाले- ‘बदनामीचे राजकारण थांबवा’
3

‘मी काँग्रेसचा…’, शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार यांनी सोडले मौन, म्हणाले- ‘बदनामीचे राजकारण थांबवा’

‘फोडाफोडीची नशा चढली, उद्या फडणवीसांनाही फोडतील’; ‘ऑपरेशन टायगर’वर संजय राऊतांचा पलटवार
4

‘फोडाफोडीची नशा चढली, उद्या फडणवीसांनाही फोडतील’; ‘ऑपरेशन टायगर’वर संजय राऊतांचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.