उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वरमधून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार.
उदय सामंत यांनी गणेश नाईक यांना कडक इशारा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पाठराखण केली आहे. 'शिंदेंच्या उठावामुळेच तुम्हाला मंत्रीपद मिळाले' असे म्हणत सामंत यांनी नाईक यांना सुनावले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात गेले अनेक दिवस अस्वस्थ असणारे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश करण्याचा मुहूर्त जवळजवळ निश्चित झाला आहे.
या निवडणुकांमध्ये सर्वच गणितं फिरली आहेत आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येही याची समीकरणं बदलताना दिसून येत आहेत. घडामोडींना अत्यंत वेग आला असून राजकीय वर्तुळात धक्कादायक घडले आहे
राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी वक्तव्य केले. यावेळी त्यांनी मतदारांना आवाहन करताना पुन्हा एकदा अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.
भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शिवसेनेचा ‘गेम’ केला असल्याचे पक्षाने अधिकृतपणे जाहीर करावे. तसेच, आगामी निवडणूक ही 'अपक्ष पुरस्कृत आघाडी' म्हणून लढवण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
भास्कर जाधव यांनी मुंबई महानगरपालिका महापौरपदाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. या राजकीय आवाहनामुळे मुंबईच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
‘आरोग्य आपल्या दारी’, गडकोट स्वच्छता मोहीम, ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ यासह अनेक लोकोपयोगी उपक्रमांची घोषणा शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली.
भ्रष्टाचाराने मुंबईची दुर्देशा केल्यामुळेच त्यांचा महापालिका निवडणुकीत पराभव झाला, अशी घणाघाती टीका शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली.
गेल्या दोन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत असलेल्या धनुष्यबाण चिन्हाबाबत शिवसेनेच्या बाजूच्या याचिकेवरील सुनावणी उद्या, शुक्रवारी होणार आहे.
Kalyan Dombivali Election News: कल्याण-डोंबिवलीत मनसेने शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करत मोठा दावा केला आहे.
मुंबई महापालिकेतील महापौरपद पाच वर्षांसाठी आपल्याकडेच ठेवण्याबाबत भाजप पूर्णपणे ठाम आहे.दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना महापौर पद शिंदे गटाला न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Maharashtra Politics: नाना पटोले यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करत मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याचे आव्हान दिले आहे. तसे शिंदे आणि अजित पवार हे भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा दावा त्यांनी केला.
शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांचे निवडून आलेले नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. ही बाब आता दिल्ली दरबारी गेली असल्याचे समोर आले आहे.
मनसे नेते अमित ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन एकनाथ शिेंदेंवर निशाणा साधला आहे. निवडून आलेल्या नगरसेवकांना एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याने टीका केली.
मार्केट, मंडई, व्यायामशाळा, स्पोर्ट्स काम्प्लेक्स असे मोठ्या कामांचे प्रस्ताव तयार करावेत. वॉर्डांमधील आरोग्य सेवा दुरुस्त झाली पाहिजे. शिवसेनेचा नगरसेवक लोकांमध्ये फिरताना दिसलाच पाहिजे, असे शिंदे म्हणाले.
BMC Mayor: मुंबईसह २९ महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत २२ जानेवारीला होणार आहे. भाजप आणि शिंदे गटात अडीच वर्षांच्या सूत्रावरून चर्चा सुरू असतानाच, संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.