काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील मृत प्राध्यापकांचे नाव राजाराम उत्तम लोंढे असे आहे. ते शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल विभागप्रमुख (HOD) म्हणून कार्यरत होते. तर आरोपींचे नाव विशाल राठोड, आकाश पवार आणि करण आडे असे आहे. प्राध्यापक आणि आरोपींमध्ये 50 लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला होता.‘खतरों के खिलाड़ी’(Khatro ke Khiladi) सारखा टीव्ही शो तयार करून पैसे कमावण्याच्या उद्देशाने हा व्यवहार करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र पैसे घेतल्यानंतर अनेक दिवस उलटूनही कोणताही शो तयार न झाल्याने प्राध्यापकांनी वारंवार पैश्यांची मागणी केली.
पार्टीसाठी बोलावले आणि…
या सततच्या तगाद्यामुळे आरोपींनी प्राध्यापकांना दौलताबाद येथे पार्टीसाठी बोलावले. तेथे पार्टी झाल्यांनतर परत येतांना आरोपींनी प्राध्यापकांच्या स्वतःच्या पिस्तुलातून त्यांच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर शहरातील एका रुग्णालयाजवळ येईपर्यंत त्यांचा मोबाईल ऑन ठेवण्यात आला, जेणेकरून ते जिवंत असल्याचा भास निर्माण होईल.
पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; दोन वेगवेगळ्या प्रकरणांत लाखोंची फसवणूक
त्यांनतर आरोपींनी मृतदेह गाडीत ठेवून दुसऱ्या दिवशी शहरालगत असलेल्या गेवराई तांड्याजवळ गुप्तधन असल्याची माहिती एका जेसीबी चालकाला दिली. त्याच्याकडून दोन खड्डे खणून घेतले. या खड्ड्यांमध्ये पहाटे प्राध्यापकांचा मृतदेह पुरण्यात आला. हत्याकेल्यानंतर आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरल्याचा बनाव केला. तसेच प्राध्यापकांचा मोबाईल वारंवार ऑन-ऑफ करण्यात आला. त्यांना सिग्मा हॉस्पिटलजवळ सोडल्याची खोटी माहितीही देण्यात आली.
याप्रकरणी 6 फेब्रुवारी 2026 रोजी प्राध्यापक बेपत्ता असल्याची तक्रार दाखल त्यांच्या कुटुंबाने केली होती. पोलिसांना तपासादरम्यान विशाल राठोड आणि आकाश पवार यांच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांनतर दोघांनी स्वतंत्र चौकशी केली असता त्यांच्या जबाबामध्ये विरोधाभास आढळून आला. यामुळे पोलिसांना त्यांच्यावर संशय बळावला. यांनतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून सखोल चौकशी सुरु केली. तेव्हा हत्येचा संपूर्ण प्रकरण समोर आला.
पोलीस तपास सुरु
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता आरोपींच्या जबाबात मोठी तफावत आढळली. पोलिसांनी विशाल राठोडला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी विशाल आणि राजाभाऊ लोंढे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आर्थिक देवाण-घेवाणीवरून वाद सुरू होते. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला असून तिन्ही आरोपींना अटक केली आहे. . या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहे. आरोपींनी त्या पैश्यांचा काय केलं? याचा देखील पोलीस तपास करत आहे.
पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; दोन वेगवेगळ्या प्रकरणांत लाखोंची फसवणूक
Ans: छत्रपती संभाजीनगर येथे ही घटना घडली.
Ans: मृत प्राध्यापक राजाराम उत्तम लोंढे हे शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल विभागप्रमुख (HOD) म्हणून कार्यरत होते.
Ans: 50 लाखांच्या आर्थिक व्यवहारावरून वाद झाल्याने आरोपींनी त्यांची हत्या केल्याचे तपासात समोर आले.






