Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri : मंदार एज्युकेशन सोसायटीमध्ये मोठा संघर्ष! चोरी करून मानसिक छळ केल्याचा चेअरमनच्या बहिणीचा आरोप

चिपळूण तालुक्यातील पेढांबे येथील नामांकित मंदार एज्युकेशन सोसायटीच्या कारभारात मोठा वाद निर्माण झाला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 03, 2025 | 04:16 PM
Ratnagiri : मंदार एज्युकेशन सोसायटीमध्ये मोठा संघर्ष! चोरी करून मानसिक छळ केल्याचा चेअरमनच्या बहिणीचा आरोप
Follow Us
Close
Follow Us:
  • शिक्षण संस्थेत सावळा गोंधळ
  • मंदार एज्युकेशन सोसायटीमध्ये मोठा संघर्ष!
  • नेमकं प्रकरण काय ?

चिपळूण: शिक्षणासारखं पवित्र कार्य नाही मात्र याच शिक्षण संस्थेत गैरवर्तन करणाऱ्यांची देखील काही कमी नाही.  याचपार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्यातील पेढांबे येथील नामांकित मंदार एज्युकेशन सोसायटीच्या कारभारात मोठा वाद निर्माण झाला असून, संस्थेचे चेअरमन मंदार राजाराम शिंदे यांच्यासह सात कर्मचाऱ्यांविरुद्ध चोरी, आर्थिक गैरव्यवहार, मालमत्तेचे नुकसान आणि सामाजिक बहिष्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. चेअरमन मंदार शिंदे हे तक्रारदार असलेल्या डॉ. सी. वेदांती विलास सावंत यांचे सख्खे भाऊ आहेत.

डॉ. सी. वेदांती विलास सावंत (वय ६२, सध्या रा. दादर, मुंबई) यांनी पेढांबे पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार दिनांक ०१/११/२०२५ रोजी ०१.१६ वाजता दाखल झाली असून, यात मंदार राजाराम शिंदे (चेअरमन, रा. कोळकेवाडी), श्री. जितेंद्र नाना कांबळे (अलोरे कॉलनी), विजय रावजी राणे (पेढांबे भराडेवाडी), अनंत गणपत सुतार (कोळकेवाडी पठार), मारुती राणे (कोळकेवाडी पठार), सागर चंद्रकांत शिरगावकर (कुंभार्ली) आणि श्री. संतोष कदम (मुंढे) या सात जणांना आरोपी करण्यात आले आहे.

तक्रारीनुसार, जानेवारी २०२४ पर्यंत डॉ. सावंत आणि त्यांचे पती हे संस्थेच्या व्हाईस चेअरमन शैलेजा राजाराम शिंदे (फिर्यादींची आई) यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा संपूर्ण कारभार पाहत होते. मात्र, जानेवारी २०२४ मध्ये चेअरमन मंदार शिंदे यांनी संस्थेत येऊन प्रत्यक्ष कारभार पाहण्यास सुरुवात केली. चेअरमन मंदार शिंदे आणि व्हाईस चेअरमन शैलेजा शिंदे यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून बँक ऑफ इंडिया, पेढांबे शाखेतील संस्थेच्या मुख्य बँक खात्यातून अनेक मोठे आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप डॉ. सावंत यांनी केला आहे.

२० लाखांहून अधिकचा अपहार:

आरोपी मंदार शिंदे यांनी संस्थेतील ठेकेदार श्री. सतीश बाळकृष्ण शिंदे यांच्या बँक खात्यात अनेक रकमा जमा करून संस्थेच्या पैशांचा अपहार केल्याचा आरोप तक्रारीत आहे. तसेच, चेअरमन मंदार शिंदे यांनी त्यांचे सहकारी जितेंद्र कांबळे, विजय राणे, अनंत सुतार, मारुती राणे, सागर शिरगावकर आणि संतोष कदम यांच्या मदतीने संस्थेच्या मालकीची एम.एच.०४. जी. ९९०० क्रमांकाची बस बेकायदेशीररित्या भंगारात विकली. याशिवाय, संस्थेतील जीर्ण झालेले साहित्यही भंगारात विकून अंदाजे २० लाखाहून अधिकची रक्कम स्वतःकडे ठेवून संस्थेत जमा केली नाही, यामुळे संस्थेचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

सर्वात गंभीर बाब म्हणजे, दिनांक २६/०६/२०२५ रोजी डॉ. सावंत मुंबईत असताना, चेअरमन मंदार शिंदे यांच्या आदेशानुसार इतर सहा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या संस्थेतील निवासस्थानाचे कुलूप तोडून फिर्यादीच्या परवानगीशिवाय घरात प्रवेश केला. त्यांनी निवासस्थानात चोरी करून मोठे नुकसान केले.यापूर्वी २४/०३/२०२४ रोजी संस्थेच्या विश्वस्तांच्या बैठकीत डॉ. सावंत यांनी चेअरमन मंदार शिंदे यांना निवासस्थानाची वीज आणि पाणीपुरवठा का बंद केला, अशी विचारणा केली असता, मंदार शिंदे यांनी त्यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

सामाजिक बहिष्काराचेही कलम:

डॉ. सावंत यांना संस्थेत तोंडी प्रवेश बंदी करणे, डायल ११२ वर कॉल करून पोलिसांना बोलावणे, निवासस्थानाची वीज तोडणे, पाणी बंद करणे, तसेच विद्युत सापळा रचून फिर्यादीचा अपघात घडवण्याचा प्रयत्न करणे आणि संस्थेच्या कॅन्टीनमध्ये त्यांना अन्नपाणी देण्यास मज्जाव करणे अशा कृती करून त्यांना सामाजिक बहिष्कृत करण्यात आल्याचेही तक्रारीत स्पष्ट केले आहे.या गंभीर तक्रारीवरून पेढांबे पोलिसांनी आरोपींविरुद्ध भा.दं.वि. कलम ३३१(३), ३३१(४), ३०५, ३०५, ३१६(२), ३१८(४), ३५२, ३५१(२) तसेच सामाजिक बहिष्कार (प्रतिबंध आणि प्रतिबंध) कायद्याचे कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Web Title: Ratnagiri big clash in mandar education society chairmans sister alleges theft and mental torture

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 04:16 PM

Topics:  

  • education news
  • Marathi News
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

क्षितिज पटवर्धन दिग्दर्शित ‘उत्तर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, आई मुलाच्या नात्याची उलगडणार गोष्ट
1

क्षितिज पटवर्धन दिग्दर्शित ‘उत्तर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, आई मुलाच्या नात्याची उलगडणार गोष्ट

Satara News : निवडणूकीचं बिगुल वाजणार; सातारकरांना हवाय काम करणारा नगरसेवक
2

Satara News : निवडणूकीचं बिगुल वाजणार; सातारकरांना हवाय काम करणारा नगरसेवक

‘आम्ही दोघी’ नंतर मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट पुन्हा एकत्र; ‘असंभव’मधून रंगणार रहस्यमय कथा
3

‘आम्ही दोघी’ नंतर मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट पुन्हा एकत्र; ‘असंभव’मधून रंगणार रहस्यमय कथा

भंडाऱ्यात इलेक्ट्रिक वाहने सुसाट! वर्षभरात 1296 ई- वाहनांची विक्री, मात्र चार्जिंग स्टेशनचा अभाव
4

भंडाऱ्यात इलेक्ट्रिक वाहने सुसाट! वर्षभरात 1296 ई- वाहनांची विक्री, मात्र चार्जिंग स्टेशनचा अभाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.