crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात एक धक्कदायक आणि संतापजनक घटना घडली आहे. आपल्याच ८० वर्षीय जन्मदात्या वडिलांना पोरानेच अपहरण केल्याचे समोर आले आहे.आरोपी पोराने पित्याच्या गळ्यावर सूरी ठेवून आणि हात- पाय बांधून खंडणी मागितली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून तपास सुरु केला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
संशयित आरोपीचे नाव श्रीकांत दत्तात्रय मराठे (वय ४५, रा. पुणे) आहे. श्रीकांत हा सातत्याने आपल्या वडिलांकडे पैशांची मागणी करत होता. सोमवारी तो पुण्यातून देवरुखला आला आणि घरी आल्यानंतर पुन्हा पैश्यांवरून वाद झाला. रात्री ११ वाजता श्रीकांतने आपल्या आईसमोरच वडिलांच्या मानेवर सुरा ठेवून एक लाख रुपये दे, नाहीतर त्यांना ठार मारतो अशी धमकी दिली. त्याने वडिलांना जबरदस्तीने कपडे घातले आणि त्यांना दुचाकीवर बसवून घरातून बाहेर नेले.
त्यानांतर श्रीकांतने आपल्या वडिलांचा अपहरण केला. त्यांचे हात-पाय आणि तोंड प्लास्टिक टेपने बांधला आणि त्या अवस्थेत वडिलांचा फोटो काढून आपल्या आईला व्हॉट्सअॅपवर पाठवला तसेच नकार दिल्यास मागे हटणार नाही, अशी धमकीही दिली. घाबरलेली आई सुनीता मराठे धाडस दाखवत देवरुख पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.
कसा काढला पोलिसांनी माग
पोलिसांनी त्याच्या गुगल पे वरून माग काढला. श्रीकांतने गुगल पे वापरून काही पैसे दिल्याचा मागील व्यवहार पोलिसांना मिळाल्याने त्याचा माग काढला गेला. त्यातूनच त्याचा चिपळूणकडे जात असल्याचा अंदाज आला आणि देवरुख पोलिसांनी चिपळूण पोलिसांना माहिती देऊन त्याला त्याब्यात घेण्यात आले. सध्या श्रीकांतविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याच्या वडिलांवर केलेल्या अपहरणाचा आणि धमक्यांचा तपास करीत आहेत.
पुढील तपास सुरु
श्रीकांत मराठे पुण्यात राहतो, तर त्याचे वडील दत्तात्रय मराठे (८०) हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब तसेच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतल्याने पुढील तपास सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातून परिवारातील आर्थिक आणि मानसिक ताण स्पष्ट झाला आहे.
आध्यात्मिक गुरुकुलात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, अन्य मुलींच्या शोषणाची भीती
रतनागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे येथे एक धक्कादायक घटना सामोर आली आहे. आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुल येथे अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाने गावात चर्चा सुरु झाला आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात संशयित भगवान कोकरे महाराज आणि त्याचा सहकारी प्रितेश प्रभाकर कदम यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.