तमिळ: तमिळ अभिनेत्रीची ६ वर्षापूर्वी हत्या करण्यात आली होती. मात्र हत्या कोणत्या कारणाने झाली याचा तपास लागला नव्हता. एके दिवशी चेन्नईच्या डंपयार्ड पल्लीकरणाई मध्ये एका प्लास्टिकच्या पिशवीत मानवी बोट दिसून आल होत. ती पिशवी उघडली असता एका तमिळ अभिनेत्रीच्या शरीराचे तुकडे त्यात आढळून आले. मात्र डाव्या हाताची बाजू आणि डोक्याचे भाग अजून आढळून आला नाही. २१ जानेवारी २०१९ ला झाली होती हत्या. त्याच सत्य आता बाहेर आल आहे.
हत्या कोणी आणि कशासाठी केली ?
तुतीरोकीन पोलीस ठाण्यात एका महिलेने आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. ती तक्रार दिल्यावर शरीरावर काढलेले दोन टैटु आणि जन्मखुन ओळखून आईने मुलीचा मृतदेह ओळखला. संध्या अस त्या मुलीच नाव होत. तिचा विवाह जाफरखानपेठ परिसरात झाला होता. बाळकृष्णन याने आपल्याच पत्नीच्या खून केला आणि त्याने ते तुकडे एका पिशवीत घालून फेकून दिले. 19 जानेवारीला जेव्हा त्याने खून केला आणि तो निघून गेला तेव्हा तो घरी आला नाही. पती पत्नीमध्ये भांडण झाली आणि त्याच रूपांतर हत्येमध्ये झालं.
हत्येचं कारण काय ?
बाळकृष्णनला संध्यावर संशय होता की तिचे दुसऱ्या तरुणासोबत संबध सुरू आहेत. याच संशयातून संध्या सोबत सातत्याने वाद व्हायचे. त्या रात्री या संशयाने दोघांमध्ये वाद झाले आणि त्याने कुर्हाडीने संध्यावर वार केले आणि तिचे मृतदेह पिशवीत भरून फेकून दिले. मात्र शरीराच्या काही भागाचे तुकडे मात्र आढळून आले नाहीत. 6 वर्षानंतरही तिच्या डोक्याचे भाग आढळून आला नाही. बाळकृष्णन याने आता गुन्ह्याची कबुली दिली आहे. एवढ्या वर्षानंतर खूनाच कारण समोर आल आहे. मात्र तमिळ अभिनेत्रीच्या हत्येने सगळ्यांना धक्का बसला होता. एकाच्या संशयावरून पतीने पत्नीचा जीव घेतला हे धक्कादायक आहे. पिशवीत महिलेच्या मृतदेहाचे तुकडे पाहून अनेकांची घालमेल झाली. मात्र संशय पती पत्नीच्या नात्यात घातक ठरला आणि त्यात तिचा त्याने जीव घेतला. आता त्या घटनेच सत्य बाहेर आल आहे.
Solapur Crime: चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केली पत्नीची हत्या, सोलापूर येथील घटना