Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri Crime: चिपळूणमध्ये एसीबीची धडक कारवाई! गर्भपाताच्या गोळ्यांसाठी लाच घेताना स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर रंगेहात अटकेत

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कांचन मदार यांना गर्भपाताच्या गोळ्यांचे किट देण्यासाठी ४५०० रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 04, 2026 | 12:45 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • गर्भपाताच्या गोळ्यांचे किट देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप.
  • एसीबीने ४५०० रुपये स्वीकारताना डॉ. कांचन मदार यांना पकडलं.
  • २०१५ मधील अवैध वसुलीचे जुने आरोप पुन्हा चर्चेत आले.
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथून वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. कामथे उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कांचन मदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ४ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याचे समोर आले आहे. गर्भपातासाठी लागणाऱ्या गोळ्यांचे किट देण्यासाठी लाचेची मागणी डॉ. कांचन मदार यांनी केली मात्र याच्या तक्रारीनंतर एसीबीने तातडीने सापळा रचून ही कारवाई केली.

कशी केली कारवाई?

एका सुशिक्षित महिलेने डॉ. मदार यांनी गर्भपाताच्या गोळ्यांचे किट देण्यासाठी पैशांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारीची प्राथमिक पडताळणी करण्यात आल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाईची सूत्रे हलवली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर अवघ्या सहा तासांच्या कालावधीत सापळा रचण्यात आला.

Beed Crime: दारू पार्टीत वाद अन् 36 वर्षीय तरुणाची हत्या; मृतदेह रेल्वे रुळावर टाकून आत्महत्येचा बनाव, मात्र…

त्यानुसार तक्रारदार महिलेकडून शिल्लक रकमेचे ४ हजार ५०० रुपये स्वीकारताना डॉ. कांचन मदार यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईनंतर संबंधित डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे आहे. एसीबीच्या या धडक कारवाईमुळे सरकारी कार्यालयांप्रमाणेच आरोग्य क्षेत्रातही भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेतली जात असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या कारवाईमुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.

या आधीही कांचन मदार वर आरोप

डॉ. कांचन मदार या रत्नागिरी जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील परिचित आणि चर्चित नाव मानल्या जातात. त्यांचं नाव या आधीही वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. सण २०१५ मध्ये चिपळूण पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला रुग्णांकडून दोन ते चार हजार रुपयांची अवैध वसुली केली जात असल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या आरोपांमुळे त्यावेळी आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली होती. प्रसूतीसारख्या संवेदनशील आरोग्यसेवेसाठी आर्थिक मागण्या केल्या जात असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर हे प्रकरण थेट डॉ. मदार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यापर्यंत पोहोचले होते. आता गर्भपाताच्या गोळ्यांचे किट देण्यासाठी पैशांची मागणी केल्याचे समोर आल्यानंतर पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

हिंजवडी येथील आयटी कंपनी रातोरात बंद; पोलिसांनी ‘थिंकटेक’च्या मालकाला नाशिकमधून पकडले

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणत्या डॉक्टरांवर एसीबीने कारवाई केली?

    Ans: कामथे उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कांचन मदार यांच्यावर कारवाई करण्यात आली.

  • Que: लाचेची रक्कम किती होती?

    Ans: गर्भपाताच्या गोळ्यांचे किट देण्यासाठी ४ हजार ५०० रुपयांची लाच घेताना त्यांना पकडण्यात आले.

  • Que: या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार?

    Ans: भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून एसीबी पुढील तपास करत आहे.

Web Title: Ratnagiri crime acb conducts swift raid in chiplun gynecologist arrested red handed while accepting bribe for abortion pills

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Nashik Crime:13 वर्षीय मुलीवर अत्याचार, गर्भवती झाल्यानंतर आत्महत्या, गर्भाच्या DNA ने उघड केला नराधमाचा चेहरा आणि…
1

Nashik Crime:13 वर्षीय मुलीवर अत्याचार, गर्भवती झाल्यानंतर आत्महत्या, गर्भाच्या DNA ने उघड केला नराधमाचा चेहरा आणि…

Punjab Crime: ‘घटस्फोट घेईन पण विद्यार्थ्याला सोडणार नाही’… 20 वर्षीय विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली शिक्षिका; पतीची आत्महत्या
2

Punjab Crime: ‘घटस्फोट घेईन पण विद्यार्थ्याला सोडणार नाही’… 20 वर्षीय विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली शिक्षिका; पतीची आत्महत्या

Hyderabad Crime: संतापजनक! 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच काका आणि दोन सावत्र भावांनी केला अत्याचार
3

Hyderabad Crime: संतापजनक! 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच काका आणि दोन सावत्र भावांनी केला अत्याचार

Nashik Crime: आषाढीला फराळ वाटप करून घरी निघाले अन्…; जमिनीच्या वादातून 65 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू
4

Nashik Crime: आषाढीला फराळ वाटप करून घरी निघाले अन्…; जमिनीच्या वादातून 65 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.