Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri Crime : शिवसेनेच्या दोन गटात हाणामारी; आमदार भास्कर जाधव यांच्या मुलावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये विजय केमिकल कंपनीच्या परिसरात स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राला गेलेल्या शिवसेना युवासेना उपजिल्हाप्रमुख सचिन काते यांना मारहाण केली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 07, 2025 | 02:00 PM
Ratnagiri Crime : शिवसेनेच्या दोन गटात हाणामारी; आमदार भास्कर जाधव यांच्या मुलावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Follow Us
Close
Follow Us:

चिपळूण: खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये विजय केमिकल कंपनीच्या परिसरात स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राला गेलेल्या शिवसेना युवासेना उपजिल्हाप्रमुख सचिन काते यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी विक्रांत भास्कर जाधव व अन्य दोन जणांसह काही अनोळखी व्यक्तींवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये विक्रांत जाधव गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन सुधीर काते हे लोटे एमआयडीसी परिसरात गेली दहा वर्षे विविध कंपन्यांना मजूर पुरवण्याचे काम करतात. तसंच 2021 पासून लोटे ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. दिनांक 06 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी साधारण 1 ते 1.30 वाजण्याच्या सुमारास स्थानिक रहिवासी सचिन कालेकर व रोहन कालेकर यांनी त्यांना विजय केमिकलचे मॅनेजर अनंत महाडीक यांनी कामाबाबत बोलावले असल्याची माहिती दिली. त्यानुसार फिर्यादी व अन्य दोन असे तिघेही कंपनीच्या गेटवर पोहोचले. प्रारंभी मॅनेजर महाडीक यांनी वरिष्ठांशी चर्चा करून कळवू असे सांगितले.

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! महिनाभरात ३ खून, डझनभर चाकूहल्ले; पोलिसांचा वचक संपला?

काही वेळानंतर त्यांनी तिघांना कंपनीच्या आत चर्चेसाठी बोलावले. कंपनीच्या आत प्रवेश केल्यावर तेथे विक्रांत भास्कर जाधव, सुमित शिंदे, विवेक आंब्रे तसेच सुमारे 7 ते 8 अनोळखी कामगार उपस्थित होते. स्थानिकांना रोजगार देण्याच्या मागणीवरून वाद निर्माण झाला. या वादाच्या दरम्यान विक्रांत जाधव यांनी ‘तुम्ही स्थानिक म्हणजे काय?’ असे म्हणत भांडणाला सुरुवात केलयाच दरम्यान विक्रांत जाधव यांनी फिर्यादी सचिन काते यांना हाताने मारहाण केली. तसेच जीव घेण्याची धमकी दिली. त्यावेळी सोबत असणाऱ्या सुमित शिंदे, विवेक आंब्रे व अन्य काही कामगारांनीही बेकायदेशीर जमाव जमवून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन खाते यांच्या अंगावर धावून जात मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

या घटनेबाबत स्थानिक ठेकेदार व शिवसेना युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन काते यांनी खेड पोलीस स्थानकात धाव घेऊन घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानुसार खेड पोलिसांनी आमदार भास्कर जाधव यांची चिरंजीव व रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकांत भास्कर जाधव, सुमित शिंदे, विवेक आधे यांच्या सात ते आठ जणांवर भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 189 (1), 189(2), 190, 191(2), 115(2), 352, 351 (3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या संदर्भात खेडचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील तपास सुरू आहे.

Manoj Jarange Murder Plot: बीडच्या बड्या नेत्याने रचला माझ्या हत्येचा कट रचला; मनोज जरांगेंनी थेट नावच सांगितलं

Web Title: Ratnagiri crime clashes between two shiv sena groups case registered against mla bhaskar jadhavs son at police station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 02:00 PM

Topics:  

  • crime news
  • Ratnagiri
  • Ratnagiri Crime Case

संबंधित बातम्या

धक्कादायक ! गुंगीचे औषध देऊन विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार; घरी जाताना अपहरण केलं अन्…
1

धक्कादायक ! गुंगीचे औषध देऊन विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार; घरी जाताना अपहरण केलं अन्…

तलाठी, कोतवाल ACB च्या जाळ्यात; 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले
2

तलाठी, कोतवाल ACB च्या जाळ्यात; 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! महिनाभरात ३ खून, डझनभर चाकूहल्ले; पोलिसांचा वचक संपला?
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! महिनाभरात ३ खून, डझनभर चाकूहल्ले; पोलिसांचा वचक संपला?

‘अल्पवयीन’ गुन्हेगारीचा नवा भेदक चेहरा! उमद्या वयात शिक्षणाऐवजी शस्त्र; समाजमाध्यमांवरून भाईगिरीचं प्रदर्शन
4

‘अल्पवयीन’ गुन्हेगारीचा नवा भेदक चेहरा! उमद्या वयात शिक्षणाऐवजी शस्त्र; समाजमाध्यमांवरून भाईगिरीचं प्रदर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.