Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri Crime: एक क्लिक आणि खाते रिकामे! सेवानिवृत्त शिक्षकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ‘बँक ऑफ इंडिया’ची फाईल आणि…

रत्नागिरीत सेवानिवृत्त शिक्षकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ‘बँक ऑफ इंडिया’ची बनावट पीडीएफ/एपीके फाईल शेअर झाली. ती उघडताच हॅकरने मोबाइलवर नियंत्रण मिळवून दोन शिक्षकांच्या खात्यातून एकूण ₹7,56,514 ची रक्कम लंपास केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 20, 2025 | 12:08 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • बनावट पीडीएफ/एपीके फाईल उघडताच मोबाइलचा अॅक्सेस हॅकरकडे गेला
  • दोन शिक्षकांच्या खात्यातून मिळून ₹7.56 लाखांची रक्कम गायब
  • जयगड पोलिसांत अज्ञात आरोपीविरुद्ध सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल
रत्नागिरी: रत्नागिरीतून सायबर गुन्ह्याची घटना समोर आली आहे. सेवानिवृत्त शिक्षकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ‘बँक ऑफ इंडिया’ च्या नावाची फाईल आली. ही फाईल उघडताच बँक खात्यातून रक्कम गायब झाली. एका शिक्षकाच्या बँक खात्यातून तब्बल ६ लाख ८५ हजार ५१४ आणि दुसऱ्या शिक्षकाच्या खात्यातून ७१ हजार अशी एकूण ७ लाख ५६ हजार ५१४ रुपयांची मोठी रक्कम गायब केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास करत आहे.

Pune Crime: पुण्यात मध्यरात्री कोयत्यांचा थरार; एरंडवणेतील रेस्टोबारवर टोळक्याचा हल्ला, ग्राहकांमध्ये भीतीचा माहोल

नेमकं प्रकरण काय?

जयगड येथील अकबर मोहल्ला परिसरात राहणारे सेवानिवृत्त शिक्षक नासिर अब्दुल्ला बावडे यांनी या फसवणुकीबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे ‘सेवानिवृत्त शिक्षकांचे संदखोल केंद्र’ या व्हॉट्सअॅप ग्रुपचे सदस्य आहेत. त्यांच्या या ग्रुपवर अज्ञात मोबाईल धारकाने ‘बँक ऑफ इंडिया’ संबंधित माहितीची एक अनोळखी आणि बनावट ‘पीडीएफ’ तसेच एक ‘एपीके’ (APK) फाईल पाठवली. जयगड-संदखोल येथील एका शिक्षकाने व्हॉट्सअॅपवर आलेली बनावट बँक पीडीएफ फाईल मोबाईलमध्ये ‘डाऊनलोड’ करून उघडताच आरोपीने त्यांच्या मोबाइलचा अॅक्सेस मिळवला.

यानंतर आरोपीने बावडे यांच्या ‘बँक ऑफ इंडिया’च्या पगार खाते आणि बचत खात्यामधून त्यांच्या परवानगीशिवाय ६ लाख ८५,५१४ इतकी मोठी रक्कम परस्पर अनोळखी बँक खात्यावर वळती केली. विशेष म्हणजे आरोपीने याच पद्धतीने साक्षीदार शिला शंकर वाघधरे (रा. अंबुवाही) यांच्या ‘बँक ऑफ इंडिया’ खात्यामधून देखील ₹७१,००० रक्कम काढून घेतली. अशाप्रकारे फिर्यादी आणि साक्षीदार दोघांची मिळून एकूण ७ लाख ५६ हजार ५१४ रुपयांची फसवणूक झाली.

गुन्हा दाखल

आपली सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बावडे यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेची गांभीर्याने दाखल घेत जयगड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० चे कलम ६६ (सी), ६६(डी) प्रमाणे सायबर फसवणूक, ओळख चोरी आणि संगणक स्त्रोत कोडचा गैरवापर केल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जयगड पोलीस या अज्ञात सायबर चोरट्याचा शोध घेत आहेत. नागरिकांनी अनोळखी लिंक आणि फाईल्स डाऊनलोड करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केलं आहे.

Uttarpradesh Crime: मैत्री, प्रेम आणि खून; १७ वर्षीय अल्पयीनीची हत्या करून बागेत पुरला मृतदेह, घटनास्थळी बॅग, सिंदूर…

💡

Frequently Asked Questions

  • Que: फसवणूक कोणत्या अ‍ॅपवरून झाली?

    Ans: व्हॉट्सअॅप

  • Que: फाईल कोणत्या बँकेच्या नावाने होती?

    Ans: बँक ऑफ इंडिया

  • Que: फसवणुकीची एकूण रक्कम?

    Ans: ७ लाख ५६ हजार ५१४

Web Title: Ratnagiri crime one click and account empty bank of india file and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 12:08 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Pune Crime: पुण्यात मध्यरात्री कोयत्यांचा थरार; एरंडवणेतील रेस्टोबारवर टोळक्याचा हल्ला, ग्राहकांमध्ये भीतीचा माहोल
1

Pune Crime: पुण्यात मध्यरात्री कोयत्यांचा थरार; एरंडवणेतील रेस्टोबारवर टोळक्याचा हल्ला, ग्राहकांमध्ये भीतीचा माहोल

Delhi Crime: मराठी दहावीच्या विद्यार्थ्याची मेट्रोवरून उडी; सुसाईड नोटमध्ये शिक्षकांच्या छळाचा थरकाप उडवणारा आरोप
2

Delhi Crime: मराठी दहावीच्या विद्यार्थ्याची मेट्रोवरून उडी; सुसाईड नोटमध्ये शिक्षकांच्या छळाचा थरकाप उडवणारा आरोप

Mumbai Crime: कांदिवलीत दिवसाढवळ्या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार, मनसेचा पोलिसांना अल्टिमेटम
3

Mumbai Crime: कांदिवलीत दिवसाढवळ्या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार, मनसेचा पोलिसांना अल्टिमेटम

Mumbai Crime: गोरेगाव स्टेशनबाहेर अनधिकृत भाजीवाल्यांत हाणामारी; एका विक्रेत्याचा मृत्यू
4

Mumbai Crime: गोरेगाव स्टेशनबाहेर अनधिकृत भाजीवाल्यांत हाणामारी; एका विक्रेत्याचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.