crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. कस्टम विभागाने मोठी कारवाई केल्याची समोर आली आहे. व्हेल माशाच्या उलटीची तस्करी एका कारमध्ये करण्यात येत होती. त्या उलटीची किंमत कोट्यवधींची होती. जवळपास ४ किलो 833 ग्रॅम वजनाच्या उलटीची तस्करी करण्यात येत होती. परंतु या तस्करीचा पर्दाफाश दापोली येथील सीमाशुल्क विभागाने कारचा पाठलाग करून ती कारचा पाठलाग करून तीन दापोली बस स्थानकात थांबली. त्यांनतर अधिकाऱ्यांनी या कारची झडती घेतली आणि यात असलेली व्हेल माशाची उलटी जप्त केली.
कशी केली कारवाई?
मिळालेल्या माहितीनुसार, काल शुक्रवारी व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्याचा काही जणांचा प्लॅन होता. त्यानुसार कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून संशयित कारचा पाठलाग केला. ही कार दापोली बस्थानकात थांबवून त्या कारमध्ये असलेली व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली. तसच कारमधील चार संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांच्याकडे असलेला मुद्देमाल जप्त केला. आरोपींना चौकशीसाठी दापोली येथील कस्टम्स कार्यालयात आणण्यात आले आणि त्यांच्याकडून यासंबंधित माहिती उघड करण्यात आली.
याप्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली आहे. युवराज मोरे (मुंबई),संजय धोपट (दाभोळ) निलेश साळवी (रत्नागिरी),सिराज शेख (मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. ही कारवाई सीमाशुल्क विभागाचे अधीक्षक अतुल पोतदार,निरीक्षक प्रतीक अहलावत,रमणिक सिंग,मुख्य हवालदार सुहास विलणकर,करण मेहता,प्रशांत खोब्रागडे,गौरव मौऱ्या, हेमंत वासनिक यांनी याप्रकरणी कारवाईचा बडगा उगारला.दरम्यान, संशयित आरोपीना आज न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पोलिस असल्याचे सांगून लग्नाचे आमिष दाखवलं, अनेकांना लुटून महिलांवर अत्याचार
रत्नागिरीतून एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगून विवाह संकेतस्थळावरील महिलांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून आरोपीचे नाव वैभव नरकर असे आहे. तो मूळचा रत्नागिरीचा आहे. नरकर हा स्वतःला पोलीस उपनिरीक्षक म्हणून भासवत होता. त्याने विवाह संकेतस्थळावरून महिलांना फसवले. एका महिलेसोबत बलात्कार केला आणि अनेकांकडून आर्थिक फसवणूक केल्याची माहिती देखील समोर आली आहे.