
तोतया दक्षता निरीक्षक रंगेहाथ जेरबंद
मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाची कारवाई
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात आरोपीला अटक
पुणे: रेल्वे बोर्डाचा दक्षता निरीक्षक असल्याची बनावट ओळख दाखवून रेल्वे कर्मचाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या तोतया अधिकाऱ्याला मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने रंगेहाथ पकडले. थकीत वेतन मंजुरीच्या नावाखाली २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना हरीश कांबळे (रा. मुंबई) याला २२ जानेवारी रोजी कल्याण रेल्वे स्थानक परिसरात अटक करण्यात आली.
रेल्वे कर्मचाऱ्याकडून प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर दक्षता पथकाने सखोल माहिती घेत कारवाईचे नियोजन केले. आरोपी कांबळे याने स्वतःला रेल्वे बोर्डाचा दक्षता निरीक्षक असल्याचे भासवून डीआरएम कार्यालय, मुंबई येथे प्रलंबित वेतन मंजूर करून देतो, असे सांगत तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची मागणी केली होती. संशय बळावल्यानंतर तक्रारदाराने दक्षता विभागाशी संपर्क साधला. त्यानुसार कल्याण स्थानकात सापळा रचण्यात आला आणि लाच स्वीकारताच आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
धक्कादायक ! आत्महत्येची धमकी देत अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार; फोटो, व्हिडिओही काढले अन् नंतर…
तपासात आणखी गंभीर बाब समोर आली आहे. यापूर्वीही आरोपीने बदली करून देण्याच्या आमिषाने तक्रारदाराकडून ६० हजार रुपये ऑनलाइन स्वरूपात उकळल्याचा आरोप आहे. मात्र, बदली झालीच नाही. त्यानंतर ‘थकीत रक्कम लवकर परत मिळवून देतो’ अशी नवी ऑफर देत आरोपीने पुन्हा संपर्क साधला. हा प्रकार संशयास्पद वाटल्यानेच तक्रारदाराने वेळेत दक्षता विभागाला माहिती दिली आणि फसवणूक उघडकीस आली.
अटक केल्यानंतर आरोपीला पुढील कारवाईसाठी शासकीय रेल्वे पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. फसवणूक व तोतयागिरीच्या आरोपाखाली भारतीय न्याय संहिता अधिनियम, २०२३ अंतर्गत कलम ३१८(२) आणि ३१९(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमांखाली दंडासह तीन ते पाच वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे.
Crime News: चोरट्यांचा धुमाकूळ; सोन्याची बोरमाळ लंपास; दार तोडून थेट…
अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय वाढताना दिसत आहे. त्यातच आता आत्महत्येची धमकी देत एकाने शाळकरी मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे येथे शिक्षण घेणाऱ्या पीडित मुलीने पुण्यातील भूमाता फाऊंडेशनचे कार्यालय गाठल्याने हा प्रकार पोलिसात पोहोचला असून, नऱ्हे पोलिसांनी तपासासाठी हा गुन्हा अंबड पोलिसांकडे वर्ग केला आहे.