Fake Scientist Arrested In Mumbai: मुंबई पोलिसांच्या क्राइम इंटेलिजेंस युनिट (CIU) ने एका मोठ्या फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद (60 वर्ष) यांना अटक केली आहे. अख्तर हुसेन हा भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करत होता.अहमदकडून एक बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे, जे मूळ BARC आयडीशी अगदी मिळतेजुळते आहे. पोलिसांनी त्याला तातडीने न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अहमदने BARC च्या नावाने अनेक बनावट कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे तयार केली होती. या बनावट कागदपत्रांचा वापर करून तो खाजगी ऑपरेटर्ससोबत आर्थिक व्यवहार करत होता. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या अनेक महिन्यांपासून तो शास्त्रज्ञ असल्याचे भासवून अनेक प्रभावशाली लोक आणि संस्थांना फसवले असल्याचे तपासातून समोर आले आहे.
मुंबई पोलिसांनी अहमदला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, अनेक केंद्रीय तपास संस्था देखील तपासात सामील झाल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयात उपस्थित आहेत आणि अहमदची सतत चौकशी करत आहेत.
प्रसिद्धीपत्रक सादर करत राज्य निवडणुक आयोगाने विरोधी पक्षाचे आरोप धुडकावून लावले
केंद्रीय एजन्सीकडून अहमदने कोणत्याही परदेशी व्यक्ती किंवा संस्थांना संवेदनशील राष्ट्रीय माहिती विकली का याचाही तपास सुरू आहे. पोलिस आता त्याच्या परदेश प्रवासाची आणि त्याच्याशी संबंधित लोकांची सखोल चौकशी करत आहेत. या फसवणुकीमागे मोठे नेटवर्क आहे का हे निश्चित करण्यासाठी आरोपीचे संपर्क आणि आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत.
अशाच एका प्रकरणातील आरोपी अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद याला २००४ मध्ये इंटेलिजेंस ब्युरो (IB) ने दुबईहून भारतात प्रत्यार्पण केले होते. अरब राजनयिकांना भारतीय अणुकार्यक्रमाची माहिती विकल्याच्या आरोपाखाली दुबई पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यांची चार दिवस कसून चौकशी करण्यात आली, परंतु नंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले.