
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
जयश्री मोहिते यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर बराच काळ उलटूनही त्यांना मुलं होत नव्हते. याच कारणामुळे त्या मानसिकदृष्ट्या तणावाखाली असल्याचे त्यांचा जवळच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या अधिकच शांत, चिंतेत आणि अस्वस्थ दिसत होत्या, अशी माहितीही समोर आली आहे.
धक्कादायक ! अपहरणानंतर ‘त्या’ व्यापाऱ्याची अखेर हत्या; चाळीसगाव घाटात सापडला मृतदेह
गुरुवारी सकाळच्या सुमारास जयश्री यांनी उंदीर मारण्याचं औषध प्राशन केलं. काही काळानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडू लागली. कुटुंबियांच्या लक्षात येताच तातडीने त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचार सुरु असतांना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेने मोहिते कुटुंबावर शोककळा पसरली आहे.दरम्यान, जयश्री मोहिते यांच्या पश्चात पती, सासरची मंडळी आणि माहेरचे कुटुंबीय असा परिवार आहे.
या घटनेची माहिती मिळताच अलोरे- शिरगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जयश्री यांच्या मृत्यूची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात कोणताही संशयास्पद प्रकार आढळून आलेला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. मृत्यूमागील नेमकं कारण स्पष्ट होण्यासाठी पुढील तपास सुरु असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केले जात आहे.
रत्नागिरी पोलिसांची जबरदस्त कामगिरी; तब्बल 181 किलो ड्रग्स केले नष्ट
रत्नागिरी जिल्ह्यात आहे गेल्या काही वर्षापासून अमली पदार्थांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात इक्ला आहे. त्यामुळे तरुण पिढी चे मोठे नुकसान होत आहे. या पाश्र्वभूमीवर गेल्या २०२० ते २०२५ या कालावधीत रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेतलेले सुमारे १८१ किलो एवढे विविध अमलीपदार्थ न्यायालयाच्या निर्देशानुसार पुणे येथील रांजणगाव येथे जाळून नष्ट केले. एनडीपीएस ऍक्ट १९८५ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात २०२० ते २०२५ या कालावधीमध्ये अमली पदाथांच्या संदर्भातील एकूण ६५ एनडीपीएस गुन्हे दाखल झाले होते.
या गुन्ह्यामध्ये तब्बल १८१ किलो अमलीपदार्थ पोलिसांकडून जप्त करण्यात आले होते. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. राज्याच्या पोलिस महासंचालकांनी जप्त केलेल्या हा अमली पदार्थाचा ऐवज नष्ट करण्याचे आदेश सर्वच जिल्ह्याच्या पोलिस दलाना दिले होते. त्यानुसार पुणे येथील रांजणगाव येथे न्यायालयाच्या प्राप्त आदेशानुसार हे अमली पदार्थ शुक्रवारी जाळून नष्ट करण्यात आले आहेत.
Ans: जयश्री विजय मोहिते (वय 27).
Ans: अपत्यप्राप्ती न झाल्याने आलेला मानसिक तणाव.
Ans: पोलिसांनी काय कारवाई केली आहे?