वर्षभरामध्ये ६५ गुन्ह्यात १२७ जेरबंद; ९३ लाखांचा अमलीपदार्थ साठा जप्त; शहर पोलिसांची मोठी कारवाई
एनडीपीएस (नार्कोटिक ड्रग्ज अॅण्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्स) कायद्यांतर्गत एकूण ६५ गुन्हे उघडकीस आले. त्यामध्ये १२७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत गांजा, एमडी, चरस तसेच इतर अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची किंमत ६७ लाख ८ हजार १८०, तर इतर साहित्याची किंमत २६ लाख ६४ हजार ३३० इतकी आहे. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ९३ लाख ७२ हजार ५१० रुपये आहे.
गांजाविरोधात १२ गुन्हे, २२ आरोपी अटकेत गुन्हे शाखेने गांजासंबंधी १२ गुन्हे दाखल करून २२ आरोपींना अटक केली. या प्रकरणात ८८ किलो ५५९ ग्रॅम गांजा जप्त केला. त्याची किंमत १६ लाख २७ हजार ५५० आहे. इतर साहित्याची किंमत ६ लाख ९६ हजार २५० आहे. गांजा प्रकरणामध्ये एकूण २३ लाख २३ हजार ८०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरातील अमली पदार्थांची तस्करी आणि सेवन रोखण्यासाठी पोलिसांनी शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारले आहे. अमरावती करण्यासाठी ही मोहीम भविष्यातही अधिक जोमाने सुरू राहणार आहे. तस्करांसह सेवन करणाऱ्यांविरुद्धही कारवाई केली जाईल.
चरसशी संबंधित दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून तीन आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत १ किलो ४५० ग्रॅम चरस जप्त करण्यात आला असून त्याची किंमत ३ लाख ५० हार आहे. इतर साहित्याची किंमत १५ हजार ५०० आहे. चरस प्रकरणांत एकूण ३ लाख ६५ हजार ५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ड्रग्जविरोधी मोहिमेचा भाग म्हणून गांजाचे सेवन करणाऱ्यांविरुद्धही कठोर पावले उचलण्यात आली. गांजाच्या सेवनाचे ३६ गुन्हे दाखल करून ३६ आरोपींवर खटले चालविण्यात आले. मात्र, या प्रकरणांत कोणताही अमली पदार्थ जप्त करण्यात आलेला नाही.
एमडी (ड्रग्ज) विरोधात गुन्हे शाखेने सर्वात मोठी कारवाई करत १५ गुन्हे दाखल केले. या कारवाईत ६६ आरोपींना अटक केली आहे. ७०५ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले आहे. या एमडीची किंमत ४७ लाख ३० हजार ६३० आहे. इतर तस्करीसाठी वापरलेले साहित्य १९ लाख ५२ हजार ५८० किमतीचे आहे. एमडी प्रकरणांत एकूण ६६ लाख ८३ हजार २१० किमतीचा मुद्देमाल जप्त झाला आहे.






