crime (फोटो सौजन्य- social media)
रत्नागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोठ्या भावाने सख्या लहान भावाची धारधार कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केली. ही हत्या कौटुंबिक वादातून करण्यात आल्याचे समोर आले आहे. मृत व्यक्तीच नाव विनोद गणपत तांबे असून, आरोपी मोठा भाऊ रवींद्र तांबे याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
नेमकं काय घडलं?
रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील तालुक्यातील उन्हवरे गावात एक हत्येची धक्कदायक घटना घडली. किरकोळ वादाने भावांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि मोठ्या भावाने लहान भावावर कृहाडीने वार करून निर्घृण हत्या केली. या घटनेने गावात खळबळ उडाली. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी भावाला अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपी भावाचे नाव रवींद्र तांबे असे आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आले असून पोलिसांनी मुतदेह ताब्यात घेतले असून दापोली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोघेही बंधू एका घरात राहायचे. काही दिवसांपासून त्यांच्यात घरातील मालमत्तेवरून वाद सुरु होता. शनिवारी रात्री त्याच वादातून रवींद्रचा ताबा सुटला. वाद टोकाला गेला अन् त्याने सुटले आणि त्याने खून केला, अशी माहिती स्थानिकांनी दिली. या दोन्ही भावांमध्ये नेहमी किरकोळ कारणावरून शिवीगाळ आणि भांडण होत होते. याप्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहे. गावात या धक्कादायक घटनेची चर्चा सर्वत्र होत आहे.
बीड हादरलं! प्रेयसीच्या घरी जाणे बेतले जीवावर; बेदम मारहाणीत २१ वर्षीय तरुणांचा मृत्यू
बीडमधून धक्कादायक घटना समोर आली. प्रेम संबंधातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पाच जणांवर तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आता यात खुनाचे कलम वाढविले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे शिवम काशिनाथ चिकणे (२१ वर्ष) असे आहे. तो अभियंत्रिकीचे शिक्षण घेत होता. शिवमचे गावामधीलचं एका मुली सोबत प्रेमसंबंध होते. प्रेयसीने घरी बोलावले असतांना त्यावेळी अचानक नातेवाईक तेथे आले आणि त्याच्यात वाद झाला. दरम्यान मुलीच्या नातेवाईकांनी शिवमला रस्त्यात गाठून लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर शिवमला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
महामार्गावर लूटमार करणाऱ्या परप्रांतीय टोळीला ठोकल्या बेड्या; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त