
लग्नाचे आमिष दाखवून कॅफेत नेऊन तरूणीवर अत्याचार
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता लग्नाचे आमिष दाखवून प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकाने तरुणीवर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडी सुनावली आहे.
भागवत ज्ञानोबा मुलगीर (वय २५, रा. महातपुरी ता. गंगाखेड जि. परभणी) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात २५ वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दिली. त्यानुसार, पीडितेची ओळख इन्स्टाग्रामद्वारे आरोपीशी झाली होती. यातून जवळीक वाढल्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवत २४ फेब्रुवारी २०२४ रोजी क्रांतीचौक येथे नेत एका कॅफेत तिच्यासोबत जबरदस्ती केली. त्यानंतर त्याने पीडितेच्या घरी जाऊन पुन्हा एकदा अत्याचार केला. यात पीडिता गर्भवती राहिली. याबाबत तिने मुलगीर याला सांगितले. त्याने जातिवाचक शिवीगाळ, मारहाण केली.
दरम्यान, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, गर्भपात घडवून आणला. आरोपीची बहिण व वडिलांना याची कल्पना दिल्यानंतर त्यांनीही पीडितेला शिवीगाळ केली. या प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपासासाठी पोलिस कोठडी
आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता सहाय्यक लोकाभियोक्ता कैलास पवार यांनी आरोपीचा मोबाईल जप्त करायाचा आहे. पीडितेला कोणते औषध दिले होते, ते त्याने कोठून घेतले याबाबत तपास करायचा आहे. गुन्ह्यातील पसार आरोपींना अटक करायची आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करायची असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. त्यांची ही विनंती ही मागणी मान्य केली.
हेदेखील वाचा : Akola Crime: अकोला हादरलं! शेतात अज्ञात युवतीचा जळालेला मृतदेह आढळला; हत्या की काही वेगळं?