
crime (फोटो सौजन्य: social media)
मुंबई: मुंबईत पवईतल्या स्टूडियोमध्ये १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एनकाऊंटर करण्यात आला. रोहित आर्या ने हा सगळा बनाव रचताना एक चित्रपट पाहून तशाच पद्धतीने कट आखला होता. त्याने लहान मुलांच्या अपहरणावर एक लघु पट बनवायच ठरवलं होत. त्यासाठी त्याने काही मुलांचे ऑडिशन पण घेतल्या होत्या. त्यातील १७ मुलं ही त्याने सेलेक्ट केली होती. त्याच मुलांना ओलीस ठेवून रोहित आर्या हा धमकी देत होता. अखेर त्याचा मुंबई पोलिसांनी एनकाउंटर करत द एंड केला.
‘अ थर्स डे’ चित्रपटाची प्रेरणा?
पोलीस सूत्रांकडून जी माहिती मिळाली आहे. त्यानुसार ‘अ थर्स डे’ चित्रपट पाहून त्याने प्रेरणा घेतली असेल अस सांगितलं जात आहे. या चित्रपटात यामी गौतम ज्या पद्धतीने मुलांच्या अपहरणातून आपल्या काही मागण्या या व्यवस्थेसमोर ठेवते. त्याचप्रमाणे रोहित आर्याने देखील काही मागण्या या मुलांना ओलिस ठेवून केल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण गुरुवारी घडलं, त्यामुळे या चित्रपटाच्या नावाशी साधर्म्य असल्यामुळे चर्चा सुरू झाली आहे.
रोहित आर्या ने काय काय केल?
रोहित आर्या हा एमबीए पदवीधर आहे. त्याच्या डोक्यात मुलांच्या अपहरणावर लघू पट बनवण्याचं होत. त्यासाठी त्याने त्याचा मित्र रोहन अहिरे सोबत काम पण केल. त्यासाठी त्याने काही मुलांचे ऑडिशन घेतले होते. पवईतला एक स्टूडियो हा त्याने भाड्याने घेतला होता. त्याच स्टूडियो मध्ये आर्याने हे कांड केला. स्टूडियोत असताना त्याने जे वीडियो माध्यमांना दिले होते. त्याचा ही शोध सध्या मुंबई पोलिसांमार्फत केला जात आहे.
रात्री उशिरा रोहित आर्याला पुण्यात आणण्यात आल. त्याच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रोहित आर्याच्या एनकाउंटरचा तपास हा सध्या गुन्हे शाखेकडून केला जात आहे.
‘तो वैकुंठला गेला तर…’; रोहित आर्यच्या पत्नीचा व्हिडीओ व्हायरल
मुंबईतील पवई येथील आरए स्टुडिओमध्ये १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलीस कारवाईदरम्यान त्याला गोळी लागली आणि गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पण त्याच्या मृत्यूनंतर रोहितचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे. यात त्याची पत्नी त्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात घेऊन जाताना दिसत आहे. तसेच रोहितच्या जीवाचे काही बरेवाईट झाले तर मी तुम्हाला सोडणार नाही, असंही भावनेच्या भरात बोलताना ती दिसत आहे.