• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Sambhajinagar Shaken Again Youth Murdered With Sword

Chhatrapati Sambhajinagar Murder: संभाजीनगर पुन्हा हादरले! तरुणाचा तलवारीने खून, पोरं बोलवली अन् ३० सेकंदांत…

छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या शहरातील शहाबाजार परिसरात पूर्ववैमनस्यातून तरुणाची निर्घृण हत्या. तलवारीसारख्या धारदार हत्याराने वार करून समीर खान उर्फ मालेगाव याची हत्या. पाचही आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 01, 2025 | 10:34 AM
संभाजीनगर पुन्हा हादरले! तरुणाचा तलवारीने खून (Photo Credit - X)

संभाजीनगर पुन्हा हादरले! तरुणाचा तलवारीने खून (Photo Credit - X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पूर्ववैमनस्यातून तरुणाची निर्घृण हत्या
  • शहाबाजार परिसरात खळबळ
  • पाच आरोपी ताब्यात
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): छत्रपती संभाजीनगर शहराच्या जुन्या भागातील शहाबाजार परिसरात शुक्रवारी सायंकाळी एका तरुणावर तलवारीसारख्या धारदार हत्याराने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या थरारक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवून पाचही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

३० सेकंदांत हल्ला, गळा चिरला

मृत तरुणाचे नाव समीर खान इनात खान उर्फ मालेगाव (वय ३०, रा. चेलीपुरा) असे आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही हत्या पूर्ववैमनस्यातून व सूडबुद्धीने झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारण तीन दिवसांपूर्वीच समीर खान यांच्यावर चाकू हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास समीर खान निशान दर्गा परिसरात उभा असताना, चार जण तेथे आले. त्यापैकी तिघांनी तोंडाला रुमाल, उपरणे किंवा शाल बांधलेली होती, तर चौथा साथीदार टेहळणी करत होता. या तिघांनी अचानक तलवारीसारख्या धारदार हत्याराने समीरवर सपासप वार केले. एका आरोपीने त्याचा गळा चिरला, तर दुसऱ्याने चाकूने भोसकले. केवळ ३० ते ३२ सेकंदांत हल्ला करून सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या समीरला पाहून नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली.

मित्राचा फोन आणि घटना

सायंकाळी ५ वाजता समीर खान यांना त्यांचा मित्र शारेक बाली याचा फोन आला. त्याला भेटण्यासाठी समीर खान घरातून दुचाकीवरून (एमएच-२०-जीडी-४०५८) निघाले होते. घटनेनंतर शारेक बाली यानेच समीर यांच्या पत्नीला फोन करून सांगितले की, “भाभी, समीरला तीन-चार जणांनी हत्याराने मारले.” समीर यांची पत्नी सना यांनी शहाबाजार सिटीझन हॉस्पिटलसमोरील गल्लीत धाव घेतली असता, त्यांचे पती रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. तेथे उपस्थित शारेक बाली याने शोएब काला, ईसरार खान, नसिर उर्फ ईंता आणि असलम चाऊस यांनी तलवारीने हल्ला केल्याचे सांगितले.

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये भीषण अपघात, कार शिकताना घडला काळाचा घात; बापासह तीन बहिणींचा जागीच मृत्यू

पाचही आरोपी ताब्यात, सूडबुद्धीने हत्या

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. तपासचक्रे फिरवत खबऱ्याच्या मदतीने पोलिसांनी रात्री उशिरा पाचही आरोपींना ताब्यात घेतले.

समीर खान यांची पत्नी सना खान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती शहागंज मंडी परिसरात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होते. २८ ऑक्टोबर रोजी शोएब अन्वर खान याने समीर खान व त्यांचा साथीदार शाहरुख यांच्यावर शस्त्राने हल्ला केला होता, ज्याचा गुन्हा सिटीचौक पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यानंतर २९ ऑक्टोबर रोजी समीर यांनी आसिफ रायडर, हफिज उर्फ टकला आणि शोएब काला या तिघांविरुद्ध शिवीगाळ, मारहाण व धमकीची दुसरी तक्रार दिली होती.

याच जुन्या तक्रारीचा राग मनात धरून व सूडबुद्धीने आसिफ रायडर, शोएब काला, ईसरार खान, नसिर उर्फ ईंता आणि असलम चाऊस या पाच जणांनी एकत्र येत पती समीर खान यांच्यावर तलवारीने हल्ला करून त्यांचा खून केल्याचे सना यांनी फिर्यादीत स्पष्ट केले आहे. सर्व आरोपींना आज सकाळी कोर्टात हजर केले जाणार आहे.

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर मोठी कारवाई: DRI कडून 47 कोटींचं कोकेन जप्त, पाच जण अटकेत!

Web Title: Sambhajinagar shaken again youth murdered with sword

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 10:34 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • Murder

संबंधित बातम्या

गावकऱ्यांच्या दातृत्वातून बेंदेवाडी शाळेचा ‘कायापालट’; पालकसभेतच जमा केली दीड लाखांची रोख रक्कम!
1

गावकऱ्यांच्या दातृत्वातून बेंदेवाडी शाळेचा ‘कायापालट’; पालकसभेतच जमा केली दीड लाखांची रोख रक्कम!

Cyber Fraud Case: शेअर ट्रेडिंगमध्ये ५०% नफ्याचं आमिष अन् इंजिनिअरला ४३ लाखांचा गंडा; सायबर भामट्यांनी असा लावला चुना
2

Cyber Fraud Case: शेअर ट्रेडिंगमध्ये ५०% नफ्याचं आमिष अन् इंजिनिअरला ४३ लाखांचा गंडा; सायबर भामट्यांनी असा लावला चुना

“मस्ती असेल तर पाकिस्तानात जा..”, पालकमंत्री Sanjay Shirsat यांनी Imtiaz Jaleel यांना सुनावले खडेबोल
3

“मस्ती असेल तर पाकिस्तानात जा..”, पालकमंत्री Sanjay Shirsat यांनी Imtiaz Jaleel यांना सुनावले खडेबोल

SSC HSC Exam 2026 : कॉपीमुक्त अभियानाला विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद; परिक्षा केंद्रावर ड्रोनद्वारे नजर
4

SSC HSC Exam 2026 : कॉपीमुक्त अभियानाला विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद; परिक्षा केंद्रावर ड्रोनद्वारे नजर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
टॉयलेटमध्ये वापरताय स्मार्ट फोन! Smart बना आणि ‘हे’ करा, वेळीच बदल सवय

टॉयलेटमध्ये वापरताय स्मार्ट फोन! Smart बना आणि ‘हे’ करा, वेळीच बदल सवय

Jan 29, 2026 | 01:30 AM
केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये जबाबदारी निश्चित करण्याची गरज; अनेक योजना अकार्यक्षम

केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये जबाबदारी निश्चित करण्याची गरज; अनेक योजना अकार्यक्षम

Jan 29, 2026 | 01:05 AM
धक्कादायक! जगातील सर्वात श्रीमंत देश भिकेला लागला? स्वतःच्याच नागरिकांसमोर पसरला हात

धक्कादायक! जगातील सर्वात श्रीमंत देश भिकेला लागला? स्वतःच्याच नागरिकांसमोर पसरला हात

Jan 28, 2026 | 11:20 PM
IND vs NZ 4th T20I : विषाखापट्टणममध्ये न्यूझीलंडचे जोरदार पुनरागमन! किवींकडून भारताचा 50 धावांनी पराभव 

IND vs NZ 4th T20I : विषाखापट्टणममध्ये न्यूझीलंडचे जोरदार पुनरागमन! किवींकडून भारताचा 50 धावांनी पराभव 

Jan 28, 2026 | 10:45 PM
नवीन Renault Duster बुक करण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील? जाणून घ्या संपूर्ण माहिती

नवीन Renault Duster बुक करण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Jan 28, 2026 | 10:37 PM
Maruti Grand Vitara vs Toyota Hyryder: मध्यम वर्गीय व्यक्तीसाठी कोणती SUV एकदम परफेक्ट?

Maruti Grand Vitara vs Toyota Hyryder: मध्यम वर्गीय व्यक्तीसाठी कोणती SUV एकदम परफेक्ट?

Jan 28, 2026 | 10:25 PM
IND vs NZ 4th T20I :6,6,6.., न्यूझीलंडवर कहर बनून बरसला शिवम दुबे! 15 चेंडूत झळकवले अर्धशतक 

IND vs NZ 4th T20I :6,6,6.., न्यूझीलंडवर कहर बनून बरसला शिवम दुबे! 15 चेंडूत झळकवले अर्धशतक 

Jan 28, 2026 | 10:11 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sanjay Raut on Ajit pawar plane crash : अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण बेचव -संजय राऊत

Sanjay Raut on Ajit pawar plane crash : अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण बेचव -संजय राऊत

Jan 28, 2026 | 02:11 PM
Ajit Pawar Passed Away : ‘विश्वास बसत नाही’ अजितदादांच्या निधनाने मनोज जरांगे भावूक

Ajit Pawar Passed Away : ‘विश्वास बसत नाही’ अजितदादांच्या निधनाने मनोज जरांगे भावूक

Jan 28, 2026 | 02:06 PM
Ajit Pawar Death in Plane Accident : आमचा कुटुंबप्रमुख गेला । प्रकाश सोळंके बारामतीच्या दिशेने रवाना

Ajit Pawar Death in Plane Accident : आमचा कुटुंबप्रमुख गेला । प्रकाश सोळंके बारामतीच्या दिशेने रवाना

Jan 28, 2026 | 01:14 PM
Ratnagiri : अजित दादांच्या मृत्यूने महाराष्ट्राचे मोठे नुकसान -आ. भास्कर जाधव

Ratnagiri : अजित दादांच्या मृत्यूने महाराष्ट्राचे मोठे नुकसान -आ. भास्कर जाधव

Jan 28, 2026 | 01:10 PM
Eknath Shinde On Ajit Pawar DEATH : “मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात”, पहिली प्रतिक्रिया

Eknath Shinde On Ajit Pawar DEATH : “मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात”, पहिली प्रतिक्रिया

Jan 28, 2026 | 01:05 PM
Mumbai News  : अंजली भारतीच्या अडचणीत वाढ;  मीरा भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Mumbai News : अंजली भारतीच्या अडचणीत वाढ; मीरा भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Jan 27, 2026 | 06:57 PM
Latur News : लातूर जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस वंचितची युती तुटली,दोन्ही पक्ष आमने-सामने

Latur News : लातूर जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस वंचितची युती तुटली,दोन्ही पक्ष आमने-सामने

Jan 27, 2026 | 06:47 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.