Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आढावा बैठकीला गैरहजर, कामकाजही प्रलंबित; दोन सह दुय्यम निबंधकांना कारणे दाखवा नोटीस

कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीला विनाकारण गैरहजर राहणे आणि शासकीय कामकाज प्रलंबित ठेवल्याप्रकरणी नोंदणी व मुद्रांक विभागातील दोन सह दुय्यम निबंधकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 05, 2026 | 02:36 PM
आढावा बैठकीला गैरहजर, कामकाजही प्रलंबित; दोन सह दुय्यम निबंधकांना कारणे दाखवा नोटीस

आढावा बैठकीला गैरहजर, कामकाजही प्रलंबित; दोन सह दुय्यम निबंधकांना कारणे दाखवा नोटीस

Follow Us
Follow Us:
  • दोन सह दुय्यम निबंधकांना कारणे दाखवा नोटीस
  • बैठकीला गैरहजेरी आणि कामकाज प्रलंबित ठेवल्याचा ठपका
  • दोन दिवसांत लेखी खुलासा देण्याचे आदेश
पुणे : कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीला विनाकारण गैरहजर राहणे आणि शासकीय कामकाज प्रलंबित ठेवल्याप्रकरणी नोंदणी व मुद्रांक विभागातील दोन सह दुय्यम निबंधकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. हवेली क्रमांक ३ येथील सह दुय्यम निबंधक प्रिया घुबे आणि हवेली क्रमांक १५ येथील सह दुय्यम निबंधक यतीन तावडे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे शहर यांनी या नोटिसा बजावल्या आहेत.

 

नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक, पुणे विभाग यांच्या अध्यक्षतेखाली ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता सह जिल्हा निबंधक वर्ग-१, पुणे शहर कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला संबंधित अधिकाऱ्यांना मासिक विवरणपत्रासह विहित वेळेत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, प्रिया घुबे या बैठकीला अनुपस्थित राहिल्याचे निदर्शनास आले. याशिवाय, त्यांच्या हवेली क्रमांक ३ कार्यालयातील ‘ई-प्रमाण’ प्रणालीवरील कामकाज ३ सप्टेंबर २०२६ पासून प्रलंबित असल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. हवेली क्रमांक १५ चे सह दुय्यम निबंधक यतीन तावडे हे देखील कोणतेही सबळ कारण न देता बैठकीला गैरहजर राहिले. त्यामुळे दोन्ही अधिकाऱ्यांकडून लेखी खुलासा मागविण्याचे निर्देश देण्यात आले.

वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न करणे आणि कार्यालयीन कामकाजात कुचराई करणे हे वर्तन कार्यालयीन शिस्तीला धरून नसल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांचे वर्तन महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ मधील तरतुदींचा भंग करणारे असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, याचा खुलासा नोटीस मिळाल्यापासून दोन दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हवेली क्रमांक १५ चे सह दुय्यम निबंधक यतीन तावडे यांच्याविरोधात रेरा कायद्याचे उल्लंघन करून दस्तांची नोंदणी केल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. त्यातच त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

हे सुद्धा वाचा : फर्ग्युसन रोड अतिक्रमणमुक्त करा, अन्यथा…; नगरसेवक रविंद्र साळेगावकरांचा प्रशासनाला इशारा

शहरासह राज्यातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी नियमांचे पालन न करता मनमानी पद्धतीने कामकाज करीत आहेत. अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांवर केवळ निलंबनाची कारवाई न करता त्यांना बडतर्फ करावे. नोंदणी महानिरीक्षक आणि महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा प्रकरणांत कठोर भूमिका घ्यावी. – रोहन सुरवसे  पाटील, नेते,राष्ट्रवादी काँग्रेस, पुणे.
💡

Frequently Asked Questions

  • Que: नोंदणी व मुद्रांक विभागातील कोणत्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली?

    Ans: हवेली क्रमांक ३ येथील सह दुय्यम निबंधक प्रिया घुबे आणि हवेली क्रमांक १५ येथील सह दुय्यम निबंधक यतीन तावडे यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

  • Que: दोन्ही अधिकाऱ्यांवर कोणत्या कारणांमुळे कारवाई करण्यात आली?

    Ans: कार्यालयीन आढावा बैठकीला विनाकारण गैरहजर राहणे, वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न करणे आणि शासकीय कामकाज प्रलंबित ठेवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

  • Que: संबंधित अधिकाऱ्यांना खुलासा सादर करण्यासाठी किती मुदत देण्यात आली आहे?

    Ans: नोटीस मिळाल्यापासून दोन दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: Show cause notices have been issued to two sub registrars nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • maharashtra
  • NCP News
  • pune news

संबंधित बातम्या

अजित पवारांचा जनसेवेचा वारसा पुढे चालवणार; जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव कार्यरत राहणार, सुनेत्रा पवार यांची ग्वाही
1

अजित पवारांचा जनसेवेचा वारसा पुढे चालवणार; जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव कार्यरत राहणार, सुनेत्रा पवार यांची ग्वाही

फर्ग्युसन रोड अतिक्रमणमुक्त करा, अन्यथा…; नगरसेवक रविंद्र साळेगावकरांचा प्रशासनाला इशारा
2

फर्ग्युसन रोड अतिक्रमणमुक्त करा, अन्यथा…; नगरसेवक रविंद्र साळेगावकरांचा प्रशासनाला इशारा

सोमेश्वर कारखान्याने ऊसाला प्रतिटन 4 हजारांची पहिली उचल द्यावी; दिलीप खैरे यांची मागणी
3

सोमेश्वर कारखान्याने ऊसाला प्रतिटन 4 हजारांची पहिली उचल द्यावी; दिलीप खैरे यांची मागणी

१९ वर्षीय सार्थक चव्हाणची Racing ट्रॅकवर दमदार भरारी! राष्ट्रीय स्पर्धेत पुण्याचा शिलेदार उपविजेता
4

१९ वर्षीय सार्थक चव्हाणची Racing ट्रॅकवर दमदार भरारी! राष्ट्रीय स्पर्धेत पुण्याचा शिलेदार उपविजेता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.