पुणे: पुण्यातील खराडी येथील रेव्ह पार्टी प्रकरणाने आता नवा वळण घेतला असून, या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमधून हिडन फोल्डरमधून २५२ व्हिडीओ आणि १७४९ नग्न तसेच अर्धनग्न फोटो जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये परराज्यातील मुलींवर नशेच्या प्रभावाखाली लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग केल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी याबाबत पत्रकार परिषदेत सांगितले की, या प्रकरणात सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने आयोगाच्यावतीने पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र लिहून सखोल चौकशीचे आदेश दिले होते. या पत्रात खेवलकर यांनी २८ वेळा हॉटेल रूम बुक करून परराज्यातील मुलींना आमिष दाखवून बोलावल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर आता पोलिसांचा अहवाल प्राप्त झाला आहे.
चाकणकर यांनी सांगितले की, या प्रकरणात वैश्या व्यवसायासाठी बळजबरीने मुलींचा वापर, मानवी तस्करी, आर्थिक व्यवहार आणि हॉटेल मालकांच्या भूमिकेची सखोल चौकशी आवश्यक आहे. यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी त्यांनी पोलिस महासंचालकांना पत्राद्वारे केली आहे. “सखोल चौकशी झाल्यास देशातील सर्वात मोठे घोटाळे समोर येऊ शकते,” असा दावा चाकणकर यांनी केला आहे.
प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये हिडन फोल्डरमध्ये नग्न आणि अर्धनग्न फोटो, व्हिडिओ आढळले आहेत. महिलांना चित्रपटात काम देतो म्हणून बोलवून घेण्यात आल. लोणावळा, साकीनाका येथे पार्ट्या झाल्या आहेत. त्यांच्यावर अत्याचार करण्यात आलेला आहे. महिलांसोबत आपत्तीजनक चॅटिंग केलं आहे. १ हजार ७४९ अधिक लग्न फोटो आणि व्हिडिओ सापडले आहेत. २३४ फोटो २९ व्हिडिओ अश्लील आहेत, नशा देऊन लैंगिक अत्याचार केलेले आहेत. हे फोटो, व्हिडिओ ब्लॅकमेल करण्यासाठी वापरले आहेत.