Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कंपनी ठेकेदाराच्या बाऊन्सरांकडून महिला शेतकऱ्यांना दमदाटी; जमिनीत बेकायदा ताबा घेण्याचा प्रयत्न

एका कंपनीच्या ठेकेदाराकडून शेतकऱ्यांच्या खासगी शेतजमिनीत बेकायदेशीररित्या घुसखोरी करून ताबा घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 27, 2026 | 03:09 PM
कंपनी ठेकेदाराच्या बाऊन्सरांकडून महिला शेतकऱ्यांना दमदाटी; जमिनीत बेकायदा ताबा घेण्याचा प्रयत्न

कंपनी ठेकेदाराच्या बाऊन्सरांकडून महिला शेतकऱ्यांना दमदाटी; जमिनीत बेकायदा ताबा घेण्याचा प्रयत्न

Follow Us
Follow Us:
  • कंपनी ठेकेदाराच्या बाऊन्सरांकडून महिला शेतकऱ्यांना दमदाटी
  • जमिनीत बेकायदा ताबा घेण्याचा प्रयत्न
  • दौंड तालुक्यातील प्रकार
पाटस : दौंड तालुक्यातील पाटस रेल्वे स्टेशन परिसरात नव्याने सुरू होत असलेल्या एका कंपनीच्या ठेकेदाराकडून शेतकऱ्यांच्या खासगी शेतजमिनीत बेकायदेशीररित्या घुसखोरी करून ताबा घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. कंपनीच्या ठेकेदाराकडून ठेवलेल्या बाऊन्सर व गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून महिला शेतकऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी केली जात असल्याची लेखी तक्रार शेतकऱ्यांनी यवत पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

पाटस स्टेशन परिसरात यापूर्वी दोन सिमेंट कंपन्या कार्यरत आहेत. आता आणखी एका कंपनीने या भागातील काही शेतजमिनी खरेदी केल्या आहेत. मात्र कोणतीही शासकीय मोजणी न झालेल्या आणि पाटस व कानगाव गावांच्या शिवेवरील क्षेत्रात कंपनीच्या ठेकेदारांकडून तार कंपाऊंडचे काम सुरू केले आहे. या कामादरम्यान संबंधित ठेकेदाराने बाऊन्सर आणि काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांची नेमणूक केली असून, ते शेतकऱ्यांच्या खासगी क्षेत्रात प्रवेश करून तार कंपाऊंडसाठी खड्डे खोदत आहेत. हे क्षेत्र आमचेच असल्याचा दावा करत महिला शेतकऱ्यांना शिवीगाळ व धमकावण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

शनिवारी (दि. २४) महिला शेतकरी व शेतकऱ्यांनी एकत्र येत सुरू असलेले तार कंपाऊंडचे काम बंद पाडले. तसेच पाटस–कानगाव हा शिव रस्ता बंद करण्यात आला. या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करून शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी असलेले अंतर्गत रस्तेही बंद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने बागायती क्षेत्र व उभी पिके धोक्यात आली आहेत.

गैरकृत्यांमुळे परिसरातील शेतकरी त्रस्त

शेतकऱ्यांचा आरोप आहे की, संबंधित कंपनीने बेकायदेशीररित्या भुमिहीन व वनविभागाच्या जमिनीची खरेदी केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कंपनीच्या संभाव्य गैरकृत्यांमुळे परिसरातील शेतकरी त्रस्त आहेत. कंपनी व ठेकेदारांना राजकीय वरदहस्त असून, कोणतीही मोजणी किंवा नोटीस न देता मनमानी पद्धतीने शेतकऱ्यांच्या खासगी क्षेत्रात घुसखोरी केली जात आहे.

याशिवाय पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या व शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी खोदलेल्या पोट चाऱ्याही नष्ट करण्यात आल्याचा आरोप केला आहे. यास विरोध केल्यास शेतकऱ्यांना धमकावण्यात येत असल्याच्या तक्रारीही पोलिसांकडे करण्यात आल्या आहेत.

कंपनीचे ठेकेदार व त्यांचे गुंड आमच्या शेतात येऊन ‘तुम्ही येथे शेती करू नका, हे क्षेत्र कंपनीचे आहे, येथून निघून जा, नाहीतर तुमचे काहीतरी वाईट होईल’ अशी उघड धमकी देत आहेत. त्यांच्या दहशतीमुळे महिला शेतकरी शेतात काम करताना भयभीत आहेत. या प्रकरणात मोजणीवर हरकती दाखल असून, कंपनीविरोधात दौंड येथील दिवाणी न्यायालयात दावा प्रलंबित आहे. असे असतानाही कंपनी पैसा व राजकीय वरदहस्ताच्या बळावर बाऊन्सर व गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वापर करून जाणीवपूर्वक दहशत निर्माण करत आहे. – आबासाहेब शितोळे-पाटील, शेतकरी

Web Title: There has been an incident where bouncers of a company contractor harassed women farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • crime news
  • Daund News
  • Pune Police News

संबंधित बातम्या

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
1

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
2

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
3

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
4

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.