Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निलंबित एपीआयच्या आलिशान गाड्यांवर हायकोर्टाचे सवाल; महिन्याला ९० हजार पगार, मग बीएमडब्ल्यू-मर्सिडीज कुठून आल्या?

सचिन वाझे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीत त्यांच्या आलिशान गाड्यांचा मुद्दा ऐरणीवर आला. महिन्याला सुमारे ९० हजार रुपये पगार असताना बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीजसह पाच महागड्या गाड्या कुठून आल्या? यावर न्यायालयाने तपास यंत्रणेला सवाल केले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 08, 2026 | 05:01 PM
निलंबित एपीआयच्या आलिशान गाड्यांवर हायकोर्टाचे सवाल; महिन्याला ९० हजार पगार, मग बीएमडब्ल्यू-मर्सिडीज कुठून आल्या?

निलंबित एपीआयच्या आलिशान गाड्यांवर हायकोर्टाचे सवाल; महिन्याला ९० हजार पगार, मग बीएमडब्ल्यू-मर्सिडीज कुठून आल्या?

Follow Us
Follow Us:
  • वाझेंच्या जामीन अर्जावर तीन तास सुनावणी; दुपारी पुन्हा युक्तिवाद
  • महिन्याला ९० हजार पगार, तरी बीएमडब्ल्यू-मर्सिडीजसह पाच महागड्या गाड्या
  • वाझेंच्या संपत्ती आणि आलिशान गाड्यांवर उच्च न्यायालयाचे गंभीर सवाल
 

मुंबई : बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात आज तब्बल तीन तास सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान वाझे यांच्याकडे असलेल्या संपत्ती आणि आलिशान गाड्यांवरून न्यायालयाने तपास यंत्रणा आणि पोलीस प्रशासनाला सवाल केले. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

सकाळच्या सत्रात तीन तास सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने कामकाज स्थगित केले. जामीन अर्जावर दुपारच्या सत्रात पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागले आहे. सुनावणीदरम्यान सचिन वाझे वापरत असलेल्या महागड्या गाड्यांचा मुद्दा उपस्थित झाला. त्यावेळी न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी वाझे यांच्या मर्सिडीज वापराबाबत प्रश्न उपस्थित केला.

न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी :

“ते मर्सिडीज गाडीतून आले, हे सगळे कुठून आले? ते मर्सिडीज वापरत होते, हे तुमच्या रेकॉर्डवर आले आहे का? एका एपीआयच्या मालकीची मर्सिडीज आहे?” त्यावर सॉलिसिटर जनरल यांनी एका एपीआयच्या मालकीची मर्सिडीज असल्याचे सांगितले. तसेच, खुद्द पोलीस आयुक्तांकडेही स्वतःच्या मालकीची मर्सिडीज नसल्याचे त्यांनी नमूद केले. यावर न्यायमूर्ती कुलकर्णी यांनी, “एका एपीआयच्या मालकीची मर्सिडीज असणे ही पोलीस आयुक्तांसाठी चिंतेची आणि गंभीर बाब असायला हवी,” असे निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने एका साक्षीदाराच्या जबाबाचाही उल्लेख केला. त्यानुसार सचिन वाझे दुसऱ्या गेटमधून मर्सिडीज गाडीने थेट मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात येत असत. तेथून ते थेट ‘वर्षा’ बंगल्यावरही जात असल्याचे न्यायालयात नमूद करण्यात आले.

हेही वाचा: मेटाच्या यंत्रणेला सापडले ५३ लाख धक्कादायक कंटेंट; ९८ टक्के प्रकरणे तक्रारीआधीच उघड, नेमकं काय घडलं?

महिन्याला ९० हजार पगार; पाच महागड्या गाड्या

न्यायालयाने वाझे यांच्या अधिकृत उत्पन्नाबाबतही विचारणा केली. सचिन वाझे यांचा सध्याचा मासिक पगार सुमारे ९० हजार रुपये असल्याची माहिती सुनावणीदरम्यान देण्यात आली. यानंतर न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांनी सचिन वाझे यांच्या मालकीच्या आणि वापरातील आलिशान गाड्यांची यादी न्यायालयात वाचून दाखवली. वाझे यांच्याकडे बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीजसह एकूण पाच महागड्या गाड्या असल्याचे न्यायालयात नमूद करण्यात आले.  मर्यादित अधिकृत उत्पन्न असलेल्या पोलीस अधिकाऱ्याकडे एवढ्या महागड्या गाड्या कशा आल्या, असा सवाल यावेळी न्यायालयाने उपस्थित केला. त्यामुळे वाझे यांच्या मालमत्ता आणि वाहनांबाबतचा मुद्दा सुनावणीत केंद्रस्थानी राहिला. दुपारच्या सत्रात जामीन अर्जावर होणाऱ्या पुढील सुनावणीकडे आता लक्ष लागले आहे.

Web Title: Sachin waze bail hearing high court luxury cars property sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • api
  • BMW
  • High court
  • Mumbai News
  • Mumbai Police news

संबंधित बातम्या

Mumbai News: मालमत्ताकर थकबाकीदारांवर कारवाई! ४१.५२ कोटींची थकबाकी, इम्पीरियल ग्रँड पॅलेस हॉटेलचा होणार लिलाव
1

Mumbai News: मालमत्ताकर थकबाकीदारांवर कारवाई! ४१.५२ कोटींची थकबाकी, इम्पीरियल ग्रँड पॅलेस हॉटेलचा होणार लिलाव

Nana Patekar Passed Away : नाना पाटेकर यांचे फक्त सिनेसृष्टीत नाहीतर राजकीय नेत्यांशीही होते जिव्हाळ्याचे संबंध
2

Nana Patekar Passed Away : नाना पाटेकर यांचे फक्त सिनेसृष्टीत नाहीतर राजकीय नेत्यांशीही होते जिव्हाळ्याचे संबंध

Prakash Abitkar: ‘गर्भलिंग निदान’ करणाऱ्यांवर मोक्काची टांगती तलवार; कायदा कडक करण्याची तयारी
3

Prakash Abitkar: ‘गर्भलिंग निदान’ करणाऱ्यांवर मोक्काची टांगती तलवार; कायदा कडक करण्याची तयारी

Mumbai News : मुंबईकर सावधान! 8 आणि 9 ऑक्टोबरला सायरन वाजणार, प्रशासनाने दिला मोठा अलर्ट
4

Mumbai News : मुंबईकर सावधान! 8 आणि 9 ऑक्टोबरला सायरन वाजणार, प्रशासनाने दिला मोठा अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.