Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar Crime: जादूटोणा, शिवीगाळ, मारहाणीने नाही जमलं…; पत्नीचा उपजिल्हाधिकारी पतीला संपवण्याचा प्रयत्न

2023 मध्ये देवेंद्र कटके यांची बदली संभाजीनगर येथे उपजिल्हाधिकारी (निवडणूक विभाग) या पदावर झाली. मात्र, त्यानंतर सारिकाच्या वागण्यात आणखी बदल झाला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 31, 2025 | 08:00 PM
Sambhajinagar Crime: जादूटोणा, शिवीगाळ, मारहाणीने नाही जमलं…; पत्नीचा उपजिल्हाधिकारी पतीला संपवण्याचा प्रयत्न
Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर:  छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संभाजीनगरचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप त्यांची पत्नी आणि तिच्या साथीदारांवर ठेवण्यात आला आहे. या कटात पत्नीसोबत तिची आई, भाऊ, घरातील मोलकरीण आणि तिच्या मित्राचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. तक्रारीनुसार, देवेंद्र कटके यांच्यावर जादूटोण्याद्वारे विषप्रयोग करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. तसेच, बंदूक रोखून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद आहे. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नीविरोधात दाखल केलेल्या फिर्यादीत उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील अनेक घटनांचा उल्लेख केला आहे.2000 साली, त्यांनी सारिका साहेबराव देशमुख हिच्यासोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला. लग्नानंतर, एमपीएससी परीक्षेत लाभ मिळवण्यासाठी सारिकाने अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवण्याचा आग्रह धरला. मात्र, लग्नानंतर अशा लाभांचा अधिकार नसल्याचे देवेंद्र कटके यांनी स्पष्ट सांगितले. हा नकार मिळाल्यानंतर सारिकाचे वर्तन बदलले आणि ती उद्धटपणे वागू लागली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Maharashtra Politics: राज्याच्या तिजोरी खडखडाट, ‘मोफत रेवडी’ योजना बंद होणार! मुख्य सचिवांचे आदेश

2013 मध्ये देवेंद्र कटके यांची संभाजीनगर येथे उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाली, त्यानंतर ते पत्नी आणि दोन मुलांसह जालानगर येथे स्थायिक झाले. मात्र, सारिकाचे वर्तन अधिकाधिक तुच्छतापूर्ण होत गेले. ती कटके आणि त्यांच्या मुलांकडे दुर्लक्ष करू लागली, त्यांच्याशी उद्धटपणे वागू लागली. अश्लील शिवीगाळ, आरडाओरड आणि सततच्या भांडणांमुळे घरातील वातावरण तणावपूर्ण झाले.2015 मध्ये सारिकाच्या एका कृत्यामुळे देवेंद्र कटके यांना मोठा धक्का बसला. मात्र, सासरच्या लोकांच्या माफीमुळे त्यांनी तो विषय मिटवला.2019 मध्ये, जेव्हा देवेंद्र कटके मुंबईत ड्युटीवर होते, तेव्हा कोविडमुळे त्यांनी पत्नी आणि लहान मुलाला संभाजीनगरातच ठेवले. त्यांचा मोठा मुलगा त्यावेळी आयआयटी मुंबईत शिक्षण घेत होता.

शाळा आणि विनोद उबाळेसोबतच्या ओळखीचा संबंध

2021 मध्ये, सारिकाने स्वतःची शाळा सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली, त्यामुळे देवेंद्र कटके यांनी जालना जिल्ह्यातील बोरखडी शिवार येथे ग्रीनलँड इंग्लिश स्कूल सुरू करून दिले. या शाळेच्या उभारणीचा संपूर्ण खर्च त्यांनी केला. शाळेच्या जवळच आरोपी विनोद उबाळे याचे “सद्गुरु सदानंद” नावाचे हॉटेल होते. सुरुवातीला त्याने देवेंद्र कटके यांच्याशी ओळख वाढवली आणि नंतर शाळेच्या कार्यक्रमांसाठी जेवणाच्या ऑर्डर्स घेत असल्याने तो सारिकाचा मित्र बनला.

मारहाण नाही तर फक्त कानाखाली मारली….: वाल्मिक कराडच्या जेलमधील मारहाणीवर सुरेश धस स्पष्टच बोलले

2023 मध्ये देवेंद्र कटके यांची बदली संभाजीनगर येथे उपजिल्हाधिकारी (निवडणूक विभाग) या पदावर झाली. मात्र, त्यानंतर सारिकाच्या वागण्यात आणखी बदल झाला, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, देवेंद्र कटके यांची कार (MH-21-AX-0105) सारिका वापरत होती, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव कटके यांनी त्या कारमध्ये GPS यंत्रणा बसवली होती. काही दिवसांपासून ती ठरलेल्या मार्गाने न जाता वेगळ्या रस्त्याने जात असल्याचे कटके यांच्या लक्षात आले.

3 मार्च रोजी रात्री 8:30 वाजता, त्यांनी कारच्या लोकेशननुसार केंब्रिज चौक गाठले. तिथे त्यांना सारिकाच्या कारजवळ MH-21-BU-8111 ही दुसरी कार उभी दिसली. ही कार विनोद उबाळे वापरत असल्याची माहिती कटके यांना आधीपासून होती. देवेंद्र कटके यांनी यासंदर्भात विचारणा करताच विनोद उबाळेने त्यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केली आणि थेट पिस्तूल रोखून “आडवा आलास तर उडवून टाकीन” अशी धमकी दिली.

 

Web Title: Sambhajinagar crime witchcraft abuse beatings didnt work then wife killed her deputy collector husband nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 04:30 PM

Topics:  

  • Sambhajinagar

संबंधित बातम्या

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध
1

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

भूत उतरवण्याच्या नावाखाली बुटाने मारहाण, स्वत:ची लघवी पाजायचा अन् महिलांना…; संभाजीनगरमधील या ‘भोंदू बाबा’चा पर्दाफाश
2

भूत उतरवण्याच्या नावाखाली बुटाने मारहाण, स्वत:ची लघवी पाजायचा अन् महिलांना…; संभाजीनगरमधील या ‘भोंदू बाबा’चा पर्दाफाश

‘तुझे अभी खत्म कर दूंगा’ म्हणत नशेखोराची तरूणांना मारहाण; एकाला कटरने तर दुसऱ्या लाथाबुक्क्यांनी मारलं
3

‘तुझे अभी खत्म कर दूंगा’ म्हणत नशेखोराची तरूणांना मारहाण; एकाला कटरने तर दुसऱ्या लाथाबुक्क्यांनी मारलं

Kolhapur : शिवराज्याभिषेक सोहळ्यातल्या Bhide guruji च्या वक्तव्याला सावंतांनी दिले होते प्रत्युत्तर
4

Kolhapur : शिवराज्याभिषेक सोहळ्यातल्या Bhide guruji च्या वक्तव्याला सावंतांनी दिले होते प्रत्युत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.