Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दीड महिन्याच्या बाळाचा 1 लाख 20 हजारात सौदा! संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांसह चौघांना अटक

ज्याला आईच्या कुशीत असायला हवे होते, त्या दीड महिन्याच्या बाळाचा चक्क १ लाख २० हजार रुपयांत सौदा झाल्याचा धक्कादायक प्रकार मुकुंदवाडीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 25, 2026 | 11:18 AM
दीड महिन्याच्या बाळाचा 1 लाख 20 हजारात सौदा! संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांसह चौघांना अटक

दीड महिन्याच्या बाळाचा 1 लाख 20 हजारात सौदा! संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांसह चौघांना अटक

Follow Us
Follow Us:
  • दीड महिन्याच्या बाळाचा 1 लाख 20 हजारात सौदा
  • संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
  • आई-वडिलांसह चौघांना अटक
छत्रपती संभाजीनगर : ज्याला आईच्या कुशीत असायला हवे होते, त्या दीड महिन्याच्या बाळाचा चक्क १ लाख २० हजार रुपयांत सौदा झाल्याचा धक्कादायक प्रकार मुकुंदवाडीत उघडकीस आला आहे. आर्थिक गरजेपोटी आई-वडिलांनीच बाळ एका महिलेला दिले. व्यवहारानंतर पैसे परत करून बाळ मागितले असता बहिणीकडे दिले असे सांगत बाळ देण्यास टाळाटाळ करण्यात आली. बाळ नेमके कुठे आहे, याचा ठावठिकाणाही अद्याप स्पष्ट नसल्याने या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आई-वडिलांसह बाळ खरेदी करणारी महिला व तिच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळाचे आई-वडील, बाळ विकत घेणारी आरोपी महिला आणि मध्यस्थी करणारी तिची आई अशा चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्यांना २९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती निरीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली.

 

आई-वडील आणि बाळ खरेदी करणारी महिला तसेच तिची आई, अशा चौघांविरोधात मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकुंदवाडी ठाण्याचे हवालदार यांनी फिर्याद दिली आहे. घाटीत प्रसूती झाल्यानंतर आईची बाळ खरेदी करणाऱ्या महिलेच्या आईशी ओळख झाली. पती दारू पित असल्याने बाळाचा सांभाळ कसा करणार, असे सांगत तिने तिची मुलगी लहान बाळ घेते, असे सांगितले. मुलीने बाळाच्या बदल्यात एक लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. मात्र आईने बाळ देण्यास नकार दिला. त्यानंतरही दोघींनी बाळासाठी पाठपुरावा केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

बाळाचा ठावठिकाणा नाही

तेथे बॉण्डवर स्वाक्षऱ्या करून १ लाख २० हजार रुपये रोख घेतले आणि दीड महिन्याचे बाळ संबंधित महिलेच्या ताब्यात दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बाळ दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आई वडिलांनी पैसे नकोत, बाळ परत द्या, अशी मागणी केली. त्यावर संबंधित महिलेने बाळ तिच्या बहिणीकडे दिले असून दुसऱ्या दिवशी आणून देईल, असे सांगितले. मात्र त्यानंतरही बाळ परत मिळाले नाही. बाळाचा ठावठिकाणा विचारला असता संबंधित महिला व तिच्या आईने उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

घाटीचा रेकॉर्ड; आई-वडिलांची कबुली

तक्रारीनंतर पोलिसांनी घाटी रुग्णालयातील प्रसूती विभागाच्या रजिस्टरचा सत्यप्रत उतारा मिळविला. आई-वडिलांचे जबाबही नोंदविण्यात आले. दोघांनी बाळ १ लाख २० हजार रुपयांत संबंधित महिलेला दिल्याचे मान्य केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दोघेही पूर्वीच्या लग्नानंतर आपापल्या जोडीदारांसोबत न राहता मागील तीन-चार वर्षांपासून पती-पत्नीसारखे राहत असल्याचेही चौकशीत समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा : धक्कादायक ! गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार; एकाच परिसरात दोनवेळा घडलं भयानक कृत्य

मुख्य आरोपी कमला ‘रेकॉर्डवरील’ गुन्हेगार

या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आणि बाळ विकत घेतल्याचा आरोप असलेली कमला (नाव बदलेले) ही सराईत गुन्हेगार आहे. कमलावर २०२० मध्ये क्रांती चौक पोलिस ठाण्यात एका लग्नाळू तरुणाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. लग्नाचे आमिष दाखवून तिने त्या तरुणाकडून मोठी रक्कम उकळली होती. ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीचे गुन्हे केल्यानंतर आता तिने आपला मोर्चा लहान मुलांच्या खरेदी-विक्रीकडे वळवला. त्यामुळे याप्रकरणी पोलिस सतर्क झाले आहेत.

Web Title: An incident involving the sale of a one and a half month old baby has come to light in chhatrapati sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 11:18 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Sambhajinagar

संबंधित बातम्या

धक्कादायक ! गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार; एकाच परिसरात दोनवेळा घडलं भयानक कृत्य
1

धक्कादायक ! गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार; एकाच परिसरात दोनवेळा घडलं भयानक कृत्य

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
2

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप
3

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
4

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.