crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
सांगली: सांगली येथून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका नवविवाहितेने विषारी औषध प्रश्न करून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर तिच्या सासूला कर्करोग झाल्याने तिच्या उपचारासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत, आणि सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना सांगलीतील इस्लामपूर शहरात अंबाबाई मंदिर परिसरात घडली आहे. आत्महत्या करणाऱ्या नवविवाहितेचे नाव अमृता ऋषीकेश गुरव असे आहे. ती केवळ २५ वर्षांची होती.
नेमकं काय घडलं?
अमृता आणि ऋषिकेश यांचा ११ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. संसाराच्या सुरुवातीलाच अमृताला पैश्यांसाठी त्रास सहन करावा लागला. सासूला कर्करोग झाल्याने माहेरून पैसे आण्यासाठी सतत तगादा लावण्यात यायचा. यावरून अमृतावर सतत शाब्दिक आणि मानसिक छळ होत होता. पतीसह सासू, सासरे, नणंद आणि पतीचा मामा हे मिळून तिला शिवीगाळ करत होते. याच सततच्या छळामुळे अमृताने अखेर विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेनंतर तातडीने उपचारासाठी तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. अमृताच्या आईने या प्रकरणी तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
गुन्हा दाखल?
फिर्यादीनुसार, पती ऋषीकेश अनिल गुरव, सासू अनुपमा अनिल गुरव, सासरे अनिल मधुकर गुरव, नणंद ऋतुजा अनिल गुरव (सर्व रा. इस्लामपूर) आणि पतीचा मामा नंदकिशोर पांडुरंग गुरव या पाचजणांविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून घटनेमुळे इस्लामपूर शहरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
झोपेतच पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव, 15 दिवसापूर्वीच झालं होतं लग्न
राजा रघुवंशी हत्याकांडाची देशभर चर्चा सुरू आहे . याचदरम्यान महाराष्ट्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सांगलीतील कुपवाड येथील प्रकाशनगर येथील एकता कॉलनीत राहणारे अनिल तानाजी लोखंडे (वय-50) यांची दुसरी पत्नी राधिका हिने हत्या केली. अनिल लोखंडे यांचा कुऱ्हाडीने वार करून जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मुलीला थार गाडीत नेलं, गोळ्या खायला दिल्या अन्…; साताऱ्यातील संतापजनक प्रकार