Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिमुरडीवर अत्याचार करून खून; आरोपीला फाशीची शिक्षा; जत तालुक्यातील करजगी प्रकरणाचा दीड वर्षांत निकाल

Sangli Crime Accused Sentenced To Death: सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी येथे सव्वा चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी आरोपी पांडुरंग सोमन्ना कळळी याला जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 01, 2026 | 09:20 PM
चिमुरडीवर अत्याचार करून खून; आरोपीला फाशीची शिक्षा; जत तालुक्यातील करजगी प्रकरणाचा दीड वर्षांत निकाल
Follow Us
Follow Us:
  • चिमुरडीवर अत्याचार करून खून
  • आरोपीला फाशीची शिक्षा
  • जत तालुक्यातील करजगी प्रकरणाचा दीड वर्षांत निकाल
सांगली : जत तालुक्यातील करजगी येथे सव्वा चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपी पांडुरंग सोमन्ना कळळी (वय ४५, रा. कर्जगी) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती जे. पी. मोहंती यांनी शनिवारी हा ऐतिहासिक निकाल दिला. प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी सरकारतर्फे प्रभावी बाजू मांडली.

Beed News: 2016 चा MPSC टॉपरने टॉपची लाच मागितली; अखेर ACB च्या जाळ्यात! कसा रचला सापळा?

ही घटना ६ फेब्रुवारी २०२५ रोजी घडली होती. सकाळी घरासमोर खेळत असलेल्या चिमुरडीला आरोपीने आमिष दाखवून घरात नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून गंभीर दुखापत केली व पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा खून केला. त्यानंतर मृतदेह पोत्यात भरून घरातील लोखंडी पेटीत लपवून ठेवला. घटनेनंतर बराच वेळ मुलगी आढळून न आल्याने तिच्या आजीने शोध सुरू केला. संशय आल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. तपासादरम्यान आरोपीकडे चौकशी करण्यात आली असता, त्याच्या घरातील लोखंडी पेटीतून चिमुरडीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली.

तत्कालीन पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन उपअधीक्षक सुनील साबळे व सहाय्यक निरीक्षक संदीप कांबळे यांच्या पथकाने तपास पूर्ण केला. अवघ्या २३ दिवसांत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. या खटल्यात सरकार पक्षाने १५ साक्षीदार तपासले. पीडितेची चुलत बहीण, तसेच आरोपीसोबत पीडितेला पाहणाऱ्या साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी आरोपीविरुद्ध ठोस पुरावे व युक्तिवाद सादर करत फाशीच्या शिक्षेची मागणी केली.
पुरावे, साक्षी आणि परिस्थितीजन्य बाबींचा सखोल विचार करून न्यायालयाने हा गुन्हा “अत्यंत दुर्मीळातील दुर्मीळ” स्वरूपाचा असल्याचे नमूद करत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.

आठवड्यातील दुसरी फाशी

सांगली जिल्ह्यात आठवड्याभरात फाशीची ही दुसरी शिक्षा ठरली आहे. यापूर्वी पत्नीच्या खुनाच्या प्रकरणात विटा येथील न्यायालयानेही एका आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती. जिल्ह्याच्या न्यायालयीन इतिहासात फाशीच्या शिक्षेची ही आणखी एक महत्त्वाची नोंद ठरली आहे.

गुन्हेगारांना कायद्याचा कठोर इशारा

लहान मुलांवरील अत्याचार आणि महिलांविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांबाबत न्यायालये कठोर भूमिका घेत असल्याचे या निकालातून पुन्हा अधोरेखित झाले आहे. अशा अमानुष कृत्यांना समाजात कोणतीही माफी नसून, कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा होऊ शकते, हा संदेश या निकालातून स्पष्ट झाला आहे. तसेच पालकांनी लहान मुलांवर सतत लक्ष ठेवणे, संशयास्पद हालचालींची तातडीने पोलिसांना माहिती देणे आणि बालसुरक्षेबाबत जागरूक राहणे ही काळाची गरज असल्याचेही या प्रकरणाने अधोरेखित केले आहे.

Bihar Crime: सुन्न करणारी घटना! दिराने वहिनीचे धडापासून शीर वेगळे केले अन् थेट झाडाला लटकावले; नेमकं प्रकरण काय?

Web Title: Sangli karjagi minor girl assault murder case death sentence verdict

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 09:20 PM

Topics:  

  • Court Decicion
  • Rape Case
  • Sangali News

संबंधित बातम्या

Sangali Crime: सांगली हादरवणाऱ्या आटपाडी हत्या प्रकरणाचा निकाल; अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्येप्रकरणी ७० वर्षीय आरोपीला फाशी
1

Sangali Crime: सांगली हादरवणाऱ्या आटपाडी हत्या प्रकरणाचा निकाल; अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्येप्रकरणी ७० वर्षीय आरोपीला फाशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.