कोणत्या मोहात अधिकारी अडकला जाळ्यात?
श्रीनिवास लखमवाड हे यांनी वृक्षारोपण निधी वितरणाची सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ४५ लाख मागितले होते. त्यांची तक्रार ही रेंज फॉरेस्ट ऑफिसरने केली होती. एसीबी कडे तक्रार प्राप्त झाल्यावर सुरुवातीला त्यांनी याची शहानिशा केली. जेव्हा खात्री पटली की श्रीनिवास लखमवाड यांनी लाच मागितले आहे. तेव्हा एसीबीने ट्रॅप रचला आणि थेट अधिकाऱ्याला जाळ्यात घेतलं. त्याच्या कडेजात असताना एसीबीने ५ लाखाच्या खऱ्या नोटा आणि ४० लाख बनावट नोटा त्या मध्ये टाकल्या. त्यानंतर त्यांनी राहत्या बीडमधल्या घरी लाच घेण्यासाठी बोलावल आणि त्यात त्याला ताब्यात घेण्यात आल आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. FIR दाखल झाल्यावर त्याला अटक करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
‘बहुपत्नीत्वावर बंदी का नाही?’ सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला थेट सवाल, सरकारकडे मागितले उत्तर
२०१६ चा होता एमपीएससी टॉपर! मात्र आता सगळं जाळ्यात अडकल
2016 मध्ये MPSC परीक्षेत राज्यात अव्वल ठरलेले श्रीनिवास लखमवाड आज 45 लाखांच्या कथित लाचप्रकरणामुळे ACBच्या कारवाईला सामोरे जात आहेत. एकेकाळी मेहनत आणि यशाचे प्रतीक मानल्या गेलेल्या अधिकाऱ्यावर आता गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. पुढील तपास एसीबी करत आहे .
पती खूप दारु पित होता… पत्नीने तारेने गळा आवळून केली हत्या, पोलिसांना सांगितली हार्ट अटॅकची खोटी कहाणी
राज्यात काैंटुबिक गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. किरकोळ वाद कधी भीषण रुप घेईल ते सांगता येत नाही आणि या प्रकरणातही असेच काहीसे घडून आले. पतीच्या दारुच्या व्यसनाला कंटाळून पत्नीनेच तारेने गळा आवळत पतीची हत्या केली. पतीच्या खूनानंतर जणू आपल्याला काही माहितीच नाही असा बनाव तिने रचला. तसेच पोलिसांपासून वाचण्यासाठी तिने पतीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची खोटी कहाणीही सर्वांना ऐकवली. तथापि पोलिसांना संशय येताच त्यांनी महिलेची सक्तीने चाैकशी केली ज्यात तिने आपला गुन्हा कबूल केला.






