crime (फोटो सौजन्य : pinterest)
सांगली जिल्ह्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. जन्मदात्या आईसह बहिणीनेच आपल्या ३० वर्षीय भावाचा खून करून, त्याच्या मृतदेहाला आग लावली आणि अपघाती मृत्यूचा बनाव उभा केला. मात्र, तासगाव पोलिसांनी काही तासांतच या बनावाचा भांडाफोड करत आई आणि बहिणीच्या अमानुषतेचं भयावह वास्तव उजेडात आणलं. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
१७व्या मजल्यावरून उडी मारून ३५ वर्षीय महिलेची आत्महत्या; घटना सीसीटीव्हीत कैद
ही घटना सांगली जिल्ह्यातील तासगावात घडली आहे. आपल्याच पोटच्या पोराचा आईसह त्याच्या बहिणीने खून केल्याचा समोर आला आहे. मृतकाचे नाव मयूर रामचंद्र माळी (वय वर्षे 30) असे आहे. तर आरोपी आई संगीता रामचंद्र माळी (वय वर्षे 50) आणि बहीण काजल रामचंद्र माळी (वय वर्षे 19) असे आहे. या दोघींनी मिळून आधी गुंगीचे औषध दिल. त्यानंतर दोघींनी त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. खुनानंतर मृतदेह पेटवून दिला आणि आग लागून मृत्यू झाल्याचा बनाव त्यांनी केला. मात्र, तासगाव पोलिसांना संशय आल्याने, त्यांनी आपली चक्र फिरवली आणि घटनेतील सत्य समोर आणलं.
मिळालेल्या माहितीनुसार, तासगाव शहरातील कासार गल्ली येथील मयूर रामचंद्र माळी हा सामाजिक कार्यकर्ता होता. शुक्रवारी रात्री तो मित्रांसोबत बोलत थांबला होता. नंतर तो घरी गेला. शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घरात आतील बाजूस आग लागल्याची घटना घडली. ही घटना समजताच तासगाव नगर परिषदेची अग्निशमनची गाडी घटनास्थळी दाखल झाली. आगीवर नियंत्रण मिळवले. त्यावेळी या आगीत होरपळून मयूर माळी याचा मृत्यू झाल्याचे घटनास्थळी निदर्शनास आले.
मयूर रामचंद्र माळी याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शिवविच्छेदनासाठी नेण्यात आला. त्यावेळी डोक्यात झालेल्या जखमा आणि घटनास्थळावरील परिस्थिती यामुळे पोलिसांचा या मृत्यू बाबतचा संशय बळावला, मयूरची आई संगीता आणि बहीण काजल यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी केलेल्या तपासात संगीता आणि काजल या दोघींनी मयूरला शनिवारी सकाळी गुंगीचे औषध देऊन, गुंगीत असतानाच त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे निष्पन्न झाले.
मयूरचे आई आणि बहिनी सोबत काही कारणांवरून सातत्याने वाद होत होते. या वादातूनच आई आणि बहिणीने मयूरचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेने परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केला जात आहे. अधिक तपास तासगाव पोलीस करत आहेत.
Thane Crime : मुरबाड हादरलं ! भर चौकात एकाची हत्या, कुऱ्हाडीने वारकरत डोक्याचे केले दोन भाग