हळद समारंभातच राडा; हाणामारीत दोघे जखमी, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला अन् अनर्थ टळला (फोटो सौजन्य :pinterest)
राज्यात सतत खून, लैंगिक अत्याचार या सगळ्या घटना समोर येत आहे. गुन्हेगारीने कळस गाठलं आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. आता मुरबाडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुरबाड तालुक्यातील जांभुर्डे गावात भर चौकात सर्वांसमोर एका ५२ वर्षीय व्यक्तीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. भालचंद्र बिऱ्हाडे असं मृत व्यक्तीचं नाव असून, गावातीलच गणेश भोपी या तरुणाने पूर्व वैमनस्यातून ही थरकाप उडवणारी हत्या केली.
Cyber Crime: राज्यात सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ; पिंपरीत एकाची तब्बल 17 लाखांची फसवणूक
ही घटना शनिवारी सकाळी घडली. भालचंद्र बिऱ्हाडे हे आपल्या घरून बाहेर पडून गावाच्या चौकात असलेल्या रिक्षा स्टँडकडे जात होते, तेव्हा तिथे आधीच दबा धरून बसलेल्या गणेश भोपीने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्याने कुऱ्हाडीने डोक्यावर आणि अंगावर वारंवार वार करून भालचंद्र यांचा जागीच खून केला.या हल्ल्याची तीव्रता एवढी भयानक होती की भोपीने वार केल्यानंतर भालचंद्र यांचे डोके दोन भागांमध्ये विभागले गेले. घटनेने गावात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कोणीही पुढे येण्याचे धाडस केले नाही. अखेर लोकांचा जमाव जमताच गणेशने त्या ठिकाणाहून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच मुरबाड पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम राबवत गणेश भोपीला काही तासांत अटक केली. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस तपास सुरु असून, यामध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश शिंदे, पोलीस निरीक्षक संदीप गिते, व सहायक पोलीस उपनिरीक्षक महादेव खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. गावात पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मिरज शासकीय रुग्णालयातून नवजात बाळाची चोरी
मिरज येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिरज येथील शासकीय सिव्हिल रुग्णालयात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी सकाळी एका अज्ञात महिलेने औषध देण्याच्या बहाण्याने तीन दिवसाच्या नवजात बाळाला पळवून नेले. ही घटना रुग्णालयाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला आहे.