Sanjay Raut: हा आहे फडणवीस यांचा महाराष्ट्र! संजय राऊतांचा 'या' मुद्द्यावरून राज ठाकरेंना उपरोधिक टोला
मुंबई: गुढी पाडव्यानिमित काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाष्य केले होते. याला आता संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाण साधला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या सभेत देवेंद्र फडणवीस यांना मोठ्या बहुमताने सत्ता मिळाली आहे. त्यांना सुसंस्कृत राज्याची सत्ता मिळाली आहे. त्यांनी ने नीट चालवावे. यावरून संजय राऊत यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. हे नेमके प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी हा आहे फडणवीस यांचा महाराष्ट्र! राज ठाकरे त्याना अशा उत्तम कामगिरी बद्दल पाठिंबा देणार आहेत! असा मजकूर पोस्ट केला आहे. संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. संजय राऊत यांनी बीडमध्ये एक मशिदीत झालेल्या हल्ल्यासंदर्भात व्हिडिओ पोस्ट केला आहे.
बीडमध्ये मशिदीत अज्ञातांकडून स्फोटाचा प्रयत्न
बीडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुढी पाडवा आणि ईद या दोन महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील अर्धमसला गावातील मशिदीत स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे या दोघांना अटक केली आहे.स्फोटामुळे मशिदीच्या भिंतींना तडे गेले असून, खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या सय्यद उस्मान यांनी विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे यांना पळून जाताना पाहिल्याचे सांगितले.
अर्धमसला येथे झालेल्या स्फोट प्रकरणी विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या स्फोटामुळे मशिदीच्या भिंतींना तडे गेले असून, खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. स्फोटाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सय्यद उस्मान यांनी विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे यांना घटनास्थळावरून पळून जाताना पाहिल्याचे सांगितले आहे.
हा आहे फडणवीस यांचा महाराष्ट्र!
राज ठाकरे त्याना अशा उत्तम कामगिरी बद्दल पाठिंबा देणार आहेत! https://t.co/IgbOlEmPOQ— Sanjay Raut (@rautsanjay61) March 31, 2025
विजय गव्हाणे याने जिलेटीनसह स्वतःचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. स्फोटाच्या आधीच्या रात्री गावात उरूस सुरू होता. त्यावेळी दोघांनी शिवीगाळ केली होती. गावकऱ्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. उरूस संपल्यानंतर लोक घरी परतले, मात्र रात्री अडीच वाजता अचानक स्फोटाचा मोठा आवाज आला. आवाजामुळे गावकरी जागे झाले आणि त्यांनी त्वरित पोलिसांना कळवले.
Beed News: मोठी बातमी! बीडमध्ये मशिदीत अज्ञातांकडून स्फोटाचा प्रयत्न
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तपास सुरू केला. यावेळी स्थानिक लोकांनी आरोपींना पाहिल्याची माहिती दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.