आरोपींकडे आठ ते दहा जिलेटीनच्या कांड्या आढळल्या. स्फोटाची तीव्रता कमी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अवघ्या दोन-तीन तासांत आरोपीला ताब्यात घेतले. एका माथेफिरू व्यक्तीच्या कृत्यामुळे जिल्ह्यातील शांतता भंग होऊ नये, यासाठी नागरिकांनी संयम बाळगावा व आपली एकता कायम राखावी. आज आणि उद्या सण असल्याने सर्वांनी शांतता पाळावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
जिलेटीन म्हणजे काय?
जिलेटीनच्या कांड्यांचा वापर स्फोटक म्हणून मुख्यतः खाणकामासाठी केला जातो. विशेषतः विहिरी खोदणे, रस्ते तयार करणे किंवा अन्य बांधकामाच्या वेळी अडथळा ठरणाऱ्या मोठ्या दगडांना फोडण्यासाठी जिलेटीनचा उपयोग केला जातो.