Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणात मंगेशकर रूग्णालयासह डॉ. घैसासांवर ठपका? काय आहे ससूनचा अहवाल?

Deenanath Mangeshkar Hospital: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात एका गर्भवती महिलेचा उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 17, 2025 | 09:43 PM
Pune News: गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणात मंगेशकर रूग्णालयासह डॉ. घैसासांवर ठपका? काय आहे ससूनचा अहवाल?
Follow Us
Follow Us:

पुणे: दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात तनिशा भिसे या गर्भवती महिलेचा उपचार न् मिळाल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणी राज्य सरकारकडून संताप व्यक्त केला जात आहे. राज्य सरकारने हे प्रकरण गंभीरतेने घेतले आहे. या प्रकरणात डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच ससून रूग्णालयाने आज या प्रकरणातील 6 पानी अहवाल पुणे पोलिसांकडे सादर केला आहे.

ससून रूग्णालयाच्या वैद्यकीय समितीने मंगेशकर रूग्णालय घटनेतील 6 पानांचा अहवाल सादर केला आहे. या अहवालात समितीने दीनानाथ मंगेशकर रूग्णालय आणि डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर ठपका ठेवण्यात आला नसल्याचे समोर येत आहे. अहवाल सादर झाल्यानंतर पुणे पोलिसांनी ससून रूग्णालयाकडे चार गोष्टींबाबत अभिप्राय मागितला आहे.

पुण्यातील तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी ससून हॉस्पिटलचा अहवाल वैद्यकीय शिक्षण सचिवांना सादर केला गेला आहे. मंगेशकर रूग्णालयात वैद्यकीय हलगर्जीपणा झाला का याचा तपास करण्यात आला. याआधी तीन समित्यांचे अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये दोन अहवालात मंगेशकर रूग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे.

डॉक्टर सुश्रुत घैसास यांना पोलिस संरक्षण

दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेचा ससून रुग्णालयाच्या उच्च स्तरीय समितीचा अहवाल प्राप्त होईल. त्यात कोणी दोषी असेल तर कारवाई केली जाणार आहे, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणात एक नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर आरोप होत आहेत. दरम्यान डॉक्टर घैसास यांनी पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली होती.

Pune News: दीनानाथ मंगेशकर रूग्णालय प्रकरणात मोठी अपडेट; डॉ. घैसासांची ‘ही’ मागणी पोलिसांकडून मान्य

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात एका गर्भवती महिलेचा उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रकरणात डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर डॉक्टर घैसास यांनी पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. आपल्या जीवाला धोका असल्याने डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी पुणे पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. दरम्यान पोलिसांनी ही मागणी मान्य केली आहे. पुणे पोलिसांनी एक कर्मचारी डॉक्टर घैसास यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त केला आहे.

मंगेशकर रूग्णालयाच्या अडचणी वाढणार?

दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेचा ससून रुग्णालयाच्या उच्च स्तरीय समितीचा अहवाल प्राप्त होईल. त्यात कोणी दोषी असेल तर कारवाई केली जाणार आहे, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. पुण्यात पत्रकारांशी त्या बोलत होत्या. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोप केले जात आहेत. या प्रकरणात दोन चौकशी अहवाल प्राप्त झाले आहेत.

 

Web Title: Sasoon hospital submit report to pune police about tanisha bhise death dr ghaisas and mangeshkar hospital case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2025 | 09:42 PM

Topics:  

  • crime news
  • deenanath mangeshkar hospital
  • Pune Police
  • Sasoon Hospital

संबंधित बातम्या

Maharashtra Live breaking News in Marathi:  आशियाई खेळात तिरंदाजी संघाकडून देशाला सातवे सुवर्णपदक
1

Maharashtra Live breaking News in Marathi: आशियाई खेळात तिरंदाजी संघाकडून देशाला सातवे सुवर्णपदक

Thane Crime: ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या; कार्यालयात घुसून गोळीबार, धारदार शस्त्रानेही हल्ला
2

Thane Crime: ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या; कार्यालयात घुसून गोळीबार, धारदार शस्त्रानेही हल्ला

इंदापूरच्या पश्चिम पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ; शेतीपंप, केबलसह डाळिंबाची चोरी, शेतकरी हैराण
3

इंदापूरच्या पश्चिम पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ; शेतीपंप, केबलसह डाळिंबाची चोरी, शेतकरी हैराण

‘तुम्ही अश्लील वेबसाइट…’; देवगडमध्ये Digital Arrest चा भयानक थरार, शिक्षिकेची २५ हजारांची फसवणूक
4

‘तुम्ही अश्लील वेबसाइट…’; देवगडमध्ये Digital Arrest चा भयानक थरार, शिक्षिकेची २५ हजारांची फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.