Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Crime: ट्रॅव्हल्सच्या तपासणीत सापडला कोट्यवधींचा साठा; 150 किलो चांदीसह 40 लाख रोख जप्त

सातारा जिल्ह्यातील कराड शहरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका ट्रॅव्हल्समधून तब्बल 150 किलो चांदी आणि 40 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून या मुद्देमालाची किंमत सुमारे साडेतीन कोटी रुपये आहे. कागदपत्रांची तपासणी सुरू असून आयकर विभागाकडूनही तपास केला जात आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 21, 2026 | 01:37 PM
crime (फोटो सौजन्य: AI)

crime (फोटो सौजन्य: AI)

Follow Us
Follow Us:
  • कराड वाहतूक पोलिसांनी संशयावरून ट्रॅव्हल्सची तपासणी केली.
  • वाहनातून 150 किलो चांदी आणि 40 लाखांची रोकड जप्त.
  • मुद्देमालाच्या मालकी व कागदपत्रांची पोलिसांकडून चौकशी सुरू.
सातारा: सातारा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कराड शहरात वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी कारवाई उघडकीस आली आहे. नेहमीप्रमाणे वाहतूक नियंत्रणाचे काम सुरू असताना एका ट्रॅव्हल्सवर संशय आल्याने पोलिसांनी तपासणी केली आणि त्यातून तब्बल 150 किलो चांदी तसेच 40 लाख रुपयांची रोकड सापडली. या साडेतीन कोटींच्या मुद्देमालामुळे व्यापारी आणि प्रशासनात खळबळ उडाली आहे.

कशी केली कारवाई?

कराड शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी अमोल पवार हे शहरात वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत होते. यादरम्यान समोरून येणाऱ्या एका ट्रॅव्हल्सवर त्यांना संशय आला. त्यांनी तात्काळ वाहन थांबवून त्याची झडती सुरू केली. वाहनाचा कोपरा न् कोपरा तपासत असताना अचानक पोलिसांच्या हाती सोने-चांदी व्यापाऱ्याशी संबंधित असलेला चांदीचा साठा लागला. एवढ्या मोठ्या प्रमाणातील मुद्देमाल पाहून अमोल पवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता या घटनेची माहिती पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांना दिली.

व्यावासयिक विशाल अगरवालच्या अडचणीत वाढ? जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांची न्यायालयात धाव

मुद्देमाल जप्त

याची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील यांनी तातडीने कराड शहर पोलीस निरीक्ष दत्तात्रय दराडे यांना पिढीला कारवाईचे आदेश दिले. यांनतर संबंधित संशयास्पद वाहन आणि कोट्यवधींचा मुद्देमाल पोलिसांच्या कडक बंदोबस्तात कराड शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आला. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर या 150 किलो चांदीची आणि 40 लाखांच्या रोकडीची कागदपत्रे (Documents), जीएसटी बिले (GST Bills) आणि इतर कायदेशीर परवान्यांची तपासणी करण्याची प्रक्रिया पोलिसांनी युद्धपातळीवर सुरू केली.

या प्रकरणात आयकर विभागाची एन्ट्री

एवढ्या मोठ्या प्रमाणात बेहिशोबी रक्कम आणि चांदी आढळून आल्याने या प्रकरणात आता प्राप्तिकर विभागाची एन्ट्री झाली आहे. आयकर विभागाचे विशेष पथक कराडला दाखल झाले आहे. मिळालेला मुद्देमाल अधिकृत आहे की हवाला किंवा काळ्या पैशांशी संबंधित आहे? याची कसून खातरजमा करण्याचे काम पोलीस आणि आयकर विभागाकडून संयुक्तपणे सुरू आहे. पोलिसांनी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केली नसली, तरी या कारवाईच्या बातमीने व्यापारी वर्गात आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Nasrapur Case : नसरापूर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, अंतिम युक्तिवाद पुर्ण; पुढील आठवड्यात…

💡

Frequently Asked Questions

  • Que: पोलिसांनी किती किमतीचा मुद्देमाल जप्त केला?

    Ans: पोलिसांनी सुमारे साडेतीन कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

  • Que: जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये काय होते?

    Ans: ट्रॅव्हल्समधून 150 किलो चांदी आणि 40 लाख रुपयांची रोकड आढळून आली.

  • Que: या प्रकरणाचा तपास कोण करत आहे?

    Ans: कराड पोलीस आणि आयकर विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Web Title: Satara crime massive haul found during inspection of a travel bus 150 kg of silver and 40 lakh in cash seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • crime
  • Satara
  • Satara Crime

संबंधित बातम्या

Karad Helgaon Murder Case: कराडच्या हेळगावात रस्त्याच्या वादातून कुऱ्हाड-कोयत्याने हल्ला; २८ वर्षीय तरुणाचा खून
1

Karad Helgaon Murder Case: कराडच्या हेळगावात रस्त्याच्या वादातून कुऱ्हाड-कोयत्याने हल्ला; २८ वर्षीय तरुणाचा खून

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित
2

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर
4

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.