crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
सातारा: सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कदायक घटना समोर आली आहे. चरित्राच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी गजाने हल्ला करून तिची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर हत्येनंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन हत्येची कबुली दिली आहे. हि घटना कटगुण गावातील गोसावी वस्तीवर घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
नेमकं काय घडलं?
हत्या झालेल्या महिलेचे नाव पिंकी विनोद जाधव (वय 21) असे आहे. तर आरोपी पतीचे नाव विनोद विजय जाधव (वय 26) असे आहे. पिंकीच्या लोखंडी गजाने डोक्यावर वार करून विजयने हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपी पती स्वतःच पुसेगाव पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी दिलेल्या जबाबात त्याने म्हंटले, “मी पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून लोखंडी गजाने खून केला आहे, तिचा मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे,”
ही माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सांडीओ पोमण आणि पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घरात पोहोचल्यावर पिंकी जाधव रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. पोलिसांनी तत्काळ नातेवाईकांच्या मदतीने तिला पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी विनोद जाधव याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे.
तीन लहान मुले अंधारात
पिंकीला तीन लहान मुले आहेत. आईच्या मृत्यूनंतर मुलांचे भवितव्य अंधारात गेले आहे. या अमानवी घटनेमुळे गोसावी वस्ती आणि संपूर्ण कटगुण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
‘आवाज केला तर तुला…’; मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी केली चोरी, दागिन्यांसह रक्कमही लंपास
साताऱ्यात भरदिवसा गोळीबार! जुन्या खुनाचा घेतला बदला
दरम्यान, सातारा जिल्ह्यातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. साताऱ्यातील शिरवलमध्ये एकावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. दोन हल्लेखोर दुचाकीवर आले आणि हल्लेखोरांकडून भर रस्त्यावर गोळीबार करण्यात आला. हा गोळीबार भर दिवस करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ज्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या त्याचे नाव रियाज उर्फ मन्या इकबाल शेख असे आहे. तो या गोळीबारामध्ये जखमी झाला आहे. जुन्या वादातून रियाजवर गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. याप्रकरणी शिरवळ पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहे.
Pune Crime: रस्ता न दिल्याच्या वादातून कुख्यात घायवळ टोळीचा गोळीबार; तीन राउंड फायर, गंभीर जखमी