Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फलटणमध्ये ‘हनीट्रॅप’चा पर्दाफाश; एका महिलेसह 7 जणांना अटक

फलटण शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याचे अपहरण करत, त्यास निर्जन ठिकाणी नेऊन मारहाण करून लुटल्याची घटना घडली होती. त्याच्याकडून ४ लाख रुपये खंडणी उकळण्याचा प्रयत्न या टोळीने केला होता.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 03, 2024 | 11:24 AM
फलटणमध्ये ‘हनीट्रॅप’चा पर्दाफाश; एका महिलेसह 7 जणांना अटक
Follow Us
Close
Follow Us:

फलटण : फलटण शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याचे अपहरण करत, त्यास निर्जन ठिकाणी नेऊन मारहाण करून लुटल्याची घटना घडली होती. त्याच्याकडून ४ लाख रुपये खंडणी उकळण्याचा प्रयत्न या टोळीने केला होता. या घटनेनंतर फलटण ग्रामीण पोलिसांनी जलदगतीने तपास करून टोळीतील एका महिलेसह सात जणांना १२ तासांच्या आत पकडून जेरबंद केले आहे.

सजल विलास दोशी (वय ३७, रा. न्यू भारत साडीसेंटर समोर, रविवार पेठ, फलटण) असे त्या फिर्यादी हॉटेल व्यावसायिकाचे नाव असून, त्यांनी दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात येऊन याबाबत तक्रार दिली होती. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी टोळीतील उमेश संजय खोमणे (वय २८, रा. खराडेवाडी, ता. फलटण), गणेश बाळू मदने (वय १९, रा. पाचसर्कल, खामगाव, ता. फलटण), कुमार उर्फ बोक्या लक्ष्मण शिंदे (वय २८, रा. भाडळी खुर्द, ता. फलटण) जयराज उर्फ स्वागत आनंदराव चव्हाण (वय २६, रा. झिरपवाडी, ता. फलटण) आकाश काशिनाथ डांगे (वय ३०, रा. भाडळी बुद्रुक ता. फलटण) माया (टोपण नाव) (वय ३०) अनिल गजरे (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) या सात जणांना अटक केली आहे.

सजल विलास दोशी यांचे फलटण शहरामध्ये ‘हॉटेल चॉईस’ या नावाने हॉटेल आहे. मागील चार महिन्यांपासून त्यांच्या हॉटेलमध्ये एक महिला अधूनमधून जेवणाचे पार्सल नेण्यासाठी येत होती. या महिलेचा मोबाईल क्रमांक त्यांच्याकडे होता. तिचे नाव ‘माया’ असे ते सांगत होते. या महिलेची व दोशी यांची ओळख झाल्यानंतर ३० ऑगस्ट २०२४ रोजी ही महिला दोशी यांच्यासोबत फिरायला जाण्यासाठी तयार झाली. दोशी यांनी या महिलेला ३० ऑगस्ट २०२४ रोजी सुरवडी या ठिकाणावरून त्यांच्या मोटरसायकलवर घेतले. त्यानंतर त्यांनी लोणंद, वीर धरण या ठिकाणी फेरफटका मारल्यानंतर ते लॉज शोधत होते. परंतु त्यांना लॉज न मिळाल्याने परत येत हाेते. या टोळीने फलटण, लोणंद या भागातील अनेक लोकांना यापूर्वी ‘हनीट्रॅप’मध्ये अडकवलेले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अशा लोकांनी आपल्या संबंधित पोलीस ठाण्याशी किंवा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क करावा, असे पोलिसांनी आवाहन केले आहे. या घटनेच्या अनुषंगाने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यास गुन्हा नोंद असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने करीत आहेत.

पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, शिवाजी जायपत्रे, पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने, मच्छिंद्र पाटील, पोलीस अमंलदार नितीन चतुरे, वैभव सूर्यवंशी, श्रीनाथ कदम, संदीप मदने, अमोल जगदाळे, श्रीकांत खरात, हनुमंत दडस, रशिदा पठाण यांनी ही कारवाई केली आहे.

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

काळज-बडेखानजवळ दोन व्यक्तींनी दाेषी यांना अडवून ‘आमच्या बहिणीला कुठे घेऊन फिरत आहात’ असे म्हणून त्यांना मारहाण केली. त्यांना गाडीवरून रस्त्याच्या बाजूला घेऊन गेले. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेली महिलाही त्या ठिकाणावरून निघून गेली. त्यानंतर दोशी यांना मारहाण करून रात्री ११ वाजेपर्यंत दोघांसह आणखी एक इसम दोषी यांना ‘बलात्काराची केस दाखल करणार आहोत’ अशी धमकी देत होते. यावेळी फिर्यादी दोशी यांच्याकडून बळजबरीने त्या इसमांनी ‘फोन पे’द्वारे २६ हजार रुपये घेतले व आणखी ४ लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले. आला नाही तर त्यांचे नग्न काढलेले व बलात्कार केल्याबाबतचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली, अशी तक्रार फलटण ग्रामीण पोलिसात फिर्यादी दोशी यांनी दिली.

रेकॉर्डवरीलवरील गुन्हेगाराच्या मदतीने लूट

या तक्रारीनंतर ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहिती काढून टोळीतील महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले. तिच्याकडे तपास केला असता फलटण शहरामधील रेकॉर्डवरील गुन्हेगार या महिलेच्या मदतीने प्रत्यक्ष फिर्यादीला लुटत होते, तर काही लोक मोबाईलद्वारे इतर आरोपींच्या संपर्कात राहून आरोपीला ‘हनीट्रॅप’मध्ये अडकून सुव्यवस्थितपणे कट करून फिर्यादीकडून पैसे काढत होते, असे आढळून आले. पोलिसांनी कसून तपास करून वरील आरोपींना अटक केली आहे.

Web Title: Satara news honeytrap exposed in phaltan cops arrested 1 woman including 7 persons nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 11:24 AM

Topics:  

  • crime news
  • Satara News

संबंधित बातम्या

SRISIIM परिसरात जप्त केल्या अश्लील सीडी, लैंगिक खेळणी; Chaitanyananda चे PM Modi – Obama सह बनावट फोटो जप्त
1

SRISIIM परिसरात जप्त केल्या अश्लील सीडी, लैंगिक खेळणी; Chaitanyananda चे PM Modi – Obama सह बनावट फोटो जप्त

Pranjal Khewalkar Case: प्रांजल खेवलकरांनी केले ड्रग्सचे सेवन? फॉरेन्सिकच्या रिपोर्टमुळे उडाली खळबळ
2

Pranjal Khewalkar Case: प्रांजल खेवलकरांनी केले ड्रग्सचे सेवन? फॉरेन्सिकच्या रिपोर्टमुळे उडाली खळबळ

Tasgaon News : बेकायदा दारूसाठ्यावर छापे; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त, राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांवर दबाव
3

Tasgaon News : बेकायदा दारूसाठ्यावर छापे; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त, राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांवर दबाव

गुंतवणुकीतून ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला गंडा; तब्बल 6 कोटींची फसवणूक
4

गुंतवणुकीतून ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला गंडा; तब्बल 6 कोटींची फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.