Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Crime: पोलीस दलाला मोठा धक्का! साताऱ्यातील कॉन्स्टेबलचा पोलादपूरमध्ये मृत्यू

Satara Crime: सातारा पोलीस दलातील 36 वर्षीय कॉन्स्टेबल संतोष ननावरे यांचा पोलादपूरमधील एका हॉटेलमध्ये मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली. ते मूळचे वाई तालुक्यातील ओझर्डे गावचे असून भुईंज महामार्ग पोलीस मदत केंद्रात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 02, 2026 | 06:19 PM
Satara Crime: पोलीस दलाला मोठा धक्का! (फोटो- सोशलमीडिया)

Satara Crime: पोलीस दलाला मोठा धक्का! (फोटो- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • 36 वर्षीय कॉन्स्टेबल संतोष ननावरे यांचा पोलादपूरमधील हॉटेलमध्ये मृत्यू.
  • ते भुईंज महामार्ग पोलीस मदत केंद्रात कार्यरत होते आणि मूळचे ओझर्डे, वाई येथील रहिवासी होते.
  • मृत्यूमागचं कारण अद्याप स्पष्ट नाही; पोलादपूर आणि सातारा पोलिसांकडून तपास सुरू.
सातारा पोलीस दलातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. साताऱ्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने आपलं जीवन संपवल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष ननावरे असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. त्यांचं वय 36 वर्ष होतं. ते मूळचे वाई तालुक्यातील ओझर्डे गावचे राहणारे होते. सध्या ते भुईंज महामार्ग पोलीस मदत केंद्रात कॉन्स्टेबल म्हणून काम करत होते. ही घटना पोलादपूर येथे आहे.

पोलादपूरमधील एका हॉटेलमध्ये ते थांबले होते आणि तिथेच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. शुक्रवारी सकाळी ही गोष्ट समोर आली. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी लगेच पोलादपूर पोलिसांना कळवलं. Satara Crime:

पोलिसांनी काय कारवाई केली?

घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करण्यात आला. त्यानंतर सातारा पोलिसांचं पथक पण पोलादपूरला पोहोचलं. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.36 वर्षाच्या तरुण पोलीस कर्मचाऱ्याने असं पाऊल का उचललं याबद्दल सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे. त्यांच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अजून समोर आलेलं नाही.

दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त | Navarashtra

आत्महत्येमागचं कारण काय?

पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ही कौटुंबिक कारणातून घडलेली घटना आहे का, की कामाच्या तणावातून त्यांनी हे पाऊल उचललं याचा तपास केला जात आहे. पोलीस दलात कामाचा ताण खूप असतो. त्यातून पण असं काही घडलं का याचा पण विचार केला जात आहे.काही ठिकाणी वरिष्ठांकडून त्रास होत होता का, अशी पण चर्चा केली जात असून ही फक्त चर्चा असल्याचे सांगण्यात येत आहे. अजून कोणतंही कारण अधिकृतरित्या समोर आलेलं नाही. पोलिस त्यांच्या कुटुंबीयांशी आणि सहकाऱ्यांशी बोलून माहिती घेत आहेत. त्यांच्या मोबाईलची पण तपासणी केली जात आहे.

पोलीस दलात शोककळा

संतोष ननावरे हे गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस दलात काम करत होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस दलात पण सगळे सुन्न झाले असून एक चांगला कर्मचारी अचानक निघून गेल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेने पुन्हा एकदा पोलीस कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न समोर आला आहे.

Satara Crime: घरात डोकावल्याचा संशय… चौघांनी तरुणाला बेदम मारहाण केली

पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा खूप ताण असतो. दिवस-रात्र ड्युटी, सुट्टी नाही, कुटुंबाला वेळ देता येत नाही. त्यामुळे अनेक कर्मचारी तणावात असतात.सरकारने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठी समुपदेशनाची गरज आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलादपूर पोलीस आणि सातारा पोलीस करत आहेत. तपासानंतरच खरं कारण समोर येईल.जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला अशा प्रकारचा ताण जाणवत असेल तर एकटं राहू नका. कुटुंबाशी बोला, मित्रांशी बोला किंवा जवळच्या सरकारी दवाखान्यात मदत घ्या.

Web Title: Satara police constable santosh nanaware poladpur death rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 06:19 PM

Topics:  

  • crime news marathi
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

साताऱ्यात शालेय कुस्तीचा थरार सुरू; ३५० मल्लांचा आखाडा रंगणार, शिवेंद्रसिंहराजेंकडून मल्लांना प्रोत्साहन
1

साताऱ्यात शालेय कुस्तीचा थरार सुरू; ३५० मल्लांचा आखाडा रंगणार, शिवेंद्रसिंहराजेंकडून मल्लांना प्रोत्साहन

देवस्थान इनामाच्या 111.6 गुंठ्यांच्या जमिनीबाबत गैरव्यवहाराचा आरोप; हेमंत मोरेंनी केली महत्त्वाची मागणी
2

देवस्थान इनामाच्या 111.6 गुंठ्यांच्या जमिनीबाबत गैरव्यवहाराचा आरोप; हेमंत मोरेंनी केली महत्त्वाची मागणी

Pune Teachers Voter List : मतदारयादीत ‘बॉम्बस्फोट’! मतदाराच्या नावाचा ‘बॉम्बस्फोट’ म्हणून उल्लेख, मतदार यादी पाहून सगळेच हैराण
3

Pune Teachers Voter List : मतदारयादीत ‘बॉम्बस्फोट’! मतदाराच्या नावाचा ‘बॉम्बस्फोट’ म्हणून उल्लेख, मतदार यादी पाहून सगळेच हैराण

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा
4

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.