Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Handball Championship : राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत भंडाराचा डंका! सातारा उपविजेता, नागपूरला तिसरे स्थान

Handball Championship : वाई येथे झालेल्या 48 व्या राज्यस्तरीय ज्युनिअर मुलींच्या हॅण्डबॉल स्पर्धेत भंडारा जिल्हा संघाने विजेतेपद पटकावले. यजमान सातारा उपविजेता, तर नागपूर संघाला तृतीय क्रमांक मिळाला. स्पर्धेत राज्यातील 23 जिल्ह्यांनी सहभाग घेतला.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 16, 2026 | 09:12 PM
Handball Championship : राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत भंडाराचा डंका! सातारा उपविजेता, नागपूरला तिसरे स्थान

Handball Championship : राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत भंडाराचा डंका! सातारा उपविजेता, नागपूरला तिसरे स्थान

Follow Us
Follow Us:
  • खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन
  • स्पर्धेत 23 जिल्ह्यांचा सहभाग
  • मान्यवरांकडून स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान
 

Handball Championship : महाराष्ट्र हॅण्डबॉल असोसिएशनच्या मान्यतेने आणि सातारा जिल्हा हॅण्डबॉल असोसिएशन व ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने वाई येथे आयोजित 48 व्या राज्यस्तरीय ज्युनिअर मुलींच्या अजिंक्यपद हॅण्डबॉल स्पर्धेत भंडारा जिल्हा संघाने विजेतेपद पटकावले. चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत यजमान सातारा जिल्हा संघ उपविजेता ठरला, तर नागपूर जिल्हा संघाने तृतीय क्रमांक मिळवला.

खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन

ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मैदानावर तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेचे उद्घाटन सातारा जिल्हा हॅण्डबॉल असोसिएशनचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत राज्यातील २३ जिल्हा संघांनी सहभाग नोंदवला होता. तीन दिवसांत विविध जिल्हा संघांमध्ये अत्यंत चुरशीच्या आणि रोमहर्षक लढती पाहायला मिळाल्या.

स्पर्धेसाठी मैदान, निवास, भोजन व इतर सर्व व्यवस्था अत्यंत नेटकेपणाने केल्याबद्दल राज्यभरातून आलेल्या खेळाडू व मार्गदर्शकांनी ज्ञानदीप स्कूल आणि सातारा जिल्हा हॅण्डबॉल असोसिएशनचे कौतुक करत आभार मानले.

Wai Sugarcane Transport : ऊस वाहतुकीचा बेफिकीर कारभार आणखी किती जीव घेणार?; रिफ्लेक्टरविना ट्रॉल्या बनताहेत मृत्यूचे सापळे

मान्यवरांकडून स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान

स्पर्धेतील विजेत्या संघांना विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एकनाथ जगताप, संचालक दिलीप चव्हाण, महाराष्ट्र हॅण्डबॉल असोसिएशनचे सचिव रणधीर सिंग, प्राचार्या शुभांगी पवार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सतीश डोंढगे व मिलिंद शिंदे यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

यावेळी प्रा. डॉ. समीर पवार, अमर धापते, विक्रम निकम, हरेश चव्हाण, अक्षय करपे, संतोष चौधरी, वजीर शेख, प्रा. शिवराज तलवारे, शुभम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेत पंच म्हणून अमित वाघांबरे, निलेश साळोखे, संतोष पाटील, शुभम इंग्लजकर, राकेश बनसोडे, आकाश चौगुले, शंभू देवकर, सुशांत साळवी, दर्शन रोकडे, साहिल इनामदार, जय झांबरे, अन्वय चावरे, सुमित पोतेकर, आशुतोष साळुंखे आणि सचिन कुदळे यांनी काम पाहिले.

दिवाळी झाली तरी Pune Railway Station वरून गर्दी हटेना! 13 दिवसांत 22 लाख प्रवासी तर पुणे विभागाने…

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सातारा हॅण्डबॉल असोसिएशनचे सचिव व क्रीडा विभाग प्रमुख सचिन लेंभे यांनी केले, तर विक्रम निकम यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवराज वरे, विक्रांत पोळ, गणेश निकम, सागर डेरे, अमोल खडसरे, श्रुती मांढरे, विजय चव्हाण, अर्जुन जाधव, ओम लेंभे, ज्ञानदीप स्कूलचे खेळाडू, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व हॅण्डबॉल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: राज्यस्तरीय ज्युनिअर मुलींच्या हॅण्डबॉल स्पर्धेत कोणता संघ विजेता ठरला?

    Ans: भंडारा जिल्हा संघाने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

  • Que: हॅण्डबॉल स्पर्धेत उपविजेतेपद कोणत्या संघाने मिळवले?

    Ans: यजमान सातारा जिल्हा संघाने उपविजेतेपद मिळवले.

  • Que: हॅण्डबॉल स्पर्धेचे आयोजन कोणी केले होते?

    Ans: महाराष्ट्र हॅण्डबॉल असोसिएशनच्या मान्यतेने सातारा जिल्हा हॅण्डबॉल असोसिएशन आणि ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Bhandara wins state level junior girls handball championship wai rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 09:12 PM

Topics:  

  • Bhandara
  • Satara
  • tournament

संबंधित बातम्या

रात्रीच्या अंधारात मुलींना अर्ध्या रस्त्यात उतरवणं पडलं महागात! एसटी चालक-वाहकांचे निलंबन, परिवहन मंत्र्यांचा कडक इशारा!
1

रात्रीच्या अंधारात मुलींना अर्ध्या रस्त्यात उतरवणं पडलं महागात! एसटी चालक-वाहकांचे निलंबन, परिवहन मंत्र्यांचा कडक इशारा!

Bhandara News: भंडारा-मुंढरी बसमधील प्रकार; दोन विद्यार्थिनींना अंधारातच उतरविले! विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
2

Bhandara News: भंडारा-मुंढरी बसमधील प्रकार; दोन विद्यार्थिनींना अंधारातच उतरविले! विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Satara News : तारळी प्रकल्पाविरोधात सयाजी शिंदे यांचा एल्गार! अदानींच्या प्रकल्पाची पाहणी करत थेट दिला इशारा
3

Satara News : तारळी प्रकल्पाविरोधात सयाजी शिंदे यांचा एल्गार! अदानींच्या प्रकल्पाची पाहणी करत थेट दिला इशारा

Latur News: लातूर जिल्हा बँक निवडणूक, सहकार पॅनेल बहुमताने निवडून येणार: धीरज देशमुख
4

Latur News: लातूर जिल्हा बँक निवडणूक, सहकार पॅनेल बहुमताने निवडून येणार: धीरज देशमुख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.