Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SBI Cyber Attack: सायबर हल्ल्याने SBI हादरली? हजारो ग्राहकांचा डेटा डार्क वेबवर लीक

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेच्या हजारो ग्राहकांची माहिती डार्क वेबवर पोहोचल्याचा दावा समोर आला आहे. SBI ने 3,897 ग्राहकांच्या नोंदी उघड झाल्याचे स्पष्ट केले आहे. नाव, मोबाइल क्रमांक, पत्ता, ई-मेलसह कर्जाची माहिती लीक झाल्याने आता सायबर गुन्हेगारांकडून ग्राहकांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 21, 2026 | 04:45 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • 3,897 SBI ग्राहकांची माहिती डार्क वेबवर लीक झाल्याचा दावा
  • नाव, मोबाइल, पत्ता, ई-मेल आणि कर्जाची माहिती उघड
  • OTP, PIN, CVV कुणालाही देऊ नका; फसवणूक झाल्यास 1930 वर तक्रार

मुंबई : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियावर (SBI) सायबर हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या हल्ल्यात 3,897 ग्राहकांच्या नोंदी डार्क वेबवर उघड झाल्याचे SBI ने स्पष्ट केले आहे. या डेटामध्ये ग्राहकांची वैयक्तिक माहिती तसेच कर्जाशी संबंधित तपशील असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे लीक झालेल्या माहितीचा वापर करून ग्राहकांना सायबर फसवणुकीचे लक्ष्य केले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या घटनेच्या चौकशीसाठी SBI ने स्वतंत्र सायबर सुरक्षा संस्थेची नियुक्ती केली आहे. या घटनेचा बँकेच्या मुख्य व्यवसायावर, आर्थिक कामकाजावर किंवा बँकिंग सेवा सुरू ठेवण्याच्या क्षमतेवर मोठा परिणाम होण्याची अपेक्षा नसल्याचे बँकेने म्हटले आहे.

कोणती माहिती लीक झाल्याचा दावा?

प्राथमिक विश्लेषणानुसार, डार्क वेबवर उघड झालेल्या डेटामध्ये ग्राहकांची नावे, मोबाइल क्रमांक, जन्मतारखा, ई-मेल आयडी आणि निवासी पत्ते यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय ग्राहकांची ओळख पटवणारे काही क्रमांक, कर्जाच्या नोंदी आणि अर्जाशी संबंधित तपशीलही समोर आल्याचा दावा आहे. सायबर सुरक्षा घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या ‘CyberPulse’ या ट्विटर अकाउंटनुसार, ‘Siriusim’ नावाच्या समूहाशी या हल्ल्याचा संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा प्रकार 16 ऑक्टोबर रोजी प्रथम समोर आल्याचेही या अकाउंटने म्हटले आहे. या डेटामध्ये 3.75 लाख CSV रकाने आणि 2,722 PDF दस्तऐवज असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या आकड्यांचा नेमका अर्थ काय आणि त्यांचा 3,897 ग्राहकांच्या नोंदींशी संबंध कसा आहे, हे स्वतंत्रपणे स्पष्ट होणे आवश्यक आहे.

हेही वाचा: Accident News: पुलावर अचानक बसचे नियंत्रण सुटले, पोल उडवत डिव्हायडरवर धडकली; ओझर-पिंपळगाव महामार्गावर अनेक प्रवासी जखमी

ग्राहकांना फसवणुकीचा धोका

लीक झालेल्या वैयक्तिक माहितीच्या आधारे सायबर गुन्हेगार SBI अधिकारी असल्याचे भासवून ग्राहकांना फोन करू शकतात. KYC अपडेट, कर्ज मंजुरी, खात्यातील अडचण किंवा व्यवहाराची पडताळणी अशा कारणांचा आधार घेत OTP, पासवर्ड किंवा अन्य गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. याशिवाय लीक झालेल्या तपशीलांचा वापर करून बनावट SMS, ई-मेल किंवा लिंक पाठवून ग्राहकांना फसवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मुंबईतील सायबर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ वकील प्रशांत माळी यांनी ग्राहकांनी विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

SBI ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?

ग्राहकांनी अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. कोणत्याही व्यक्तीला OTP, ATM PIN, पासवर्ड किंवा CVV देऊ नये. कर्ज, KYC किंवा बँक खात्याशी संबंधित संशयास्पद फोन आल्यास फोन करणाऱ्या व्यक्तीवर विश्वास न ठेवता SBI च्या अधिकृत माध्यमातून माहितीची खात्री करावी. अनोळखी ई-मेलमधील अटॅचमेंट उघडणेही टाळावे. खात्यात संशयास्पद व्यवहार आढळल्यास किंवा फसवणुकीचा प्रयत्न झाल्यास SBI च्या अधिकृत ग्राहकसेवा माध्यमांशी तातडीने संपर्क साधावा. आर्थिक सायबर फसवणूक झाल्यास 1930 या राष्ट्रीय हेल्पलाइनवर तक्रार नोंदवता येते. दरम्यान, डेटा लीक झाल्याचा दावा समोर आला असला तरी प्रत्येक संबंधित ग्राहकाच्या खात्यातून पैसे चोरीला गेले आहेत, असा त्याचा अर्थ होत नाही. मात्र, वैयक्तिक माहितीचा गैरवापर होऊ नये यासाठी SBI ग्राहकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: SBI च्या किती ग्राहकांची माहिती लीक झाल्याचे सांगण्यात आले आहे?

    Ans: SBI ने 3,897 ग्राहकांच्या नोंदी डार्क वेबवर उघड झाल्याचे स्पष्ट केले आहे.

  • Que: कोणती माहिती लीक झाल्याचा दावा आहे?

    Ans: नावे, मोबाइल क्रमांक, जन्मतारखा, ई-मेल आयडी, पत्ते, काही ओळख क्रमांक तसेच कर्ज आणि अर्जाशी संबंधित माहितीचा समावेश असल्याचा दावा आहे.

  • Que: या लीकमुळे खात्यातील पैसे चोरीला गेले आहेत का?

    Ans: नाही. डेटा लीक झाल्याचा अर्थ संबंधित ग्राहकांच्या खात्यातून पैसे चोरीला गेले आहेत, असा होत नाही.

Web Title: Sbi cyber attack 3897 customers data leaked dark web sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • cyber crime
  • SBI Bank

संबंधित बातम्या

SBI Data Leak Confirmed : SBI ने अखेर डेटा चोरी स्वीकारली! ग्राहकांची माहिती डार्क वेबवर लीक झाल्याची बँकेकडून पुष्टी
1

SBI Data Leak Confirmed : SBI ने अखेर डेटा चोरी स्वीकारली! ग्राहकांची माहिती डार्क वेबवर लीक झाल्याची बँकेकडून पुष्टी

४०० टक्के नफ्याच्या आमिषाने पुण्यातील महिलेला ३२ लाखांचा गंडा; सोशल मीडिया जाहिरात ठरली महागात
2

४०० टक्के नफ्याच्या आमिषाने पुण्यातील महिलेला ३२ लाखांचा गंडा; सोशल मीडिया जाहिरात ठरली महागात

Bhandara News: बनावट दस्तऐवज सादर करून लाखोंची फसवणूक! दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; सायबर गुन्ह्याची कारवाई
3

Bhandara News: बनावट दस्तऐवज सादर करून लाखोंची फसवणूक! दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; सायबर गुन्ह्याची कारवाई

State Bank Of India Mclr Interest Rate: देशातील सर्वात मोठ्या बँकेचा मोठा निर्णय! कर्ज महागणार, EMI वाढणार की काय?
4

State Bank Of India Mclr Interest Rate: देशातील सर्वात मोठ्या बँकेचा मोठा निर्णय! कर्ज महागणार, EMI वाढणार की काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.