Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

४०० टक्के नफ्याच्या आमिषाने पुण्यातील महिलेला ३२ लाखांचा गंडा; सोशल मीडिया जाहिरात ठरली महागात

शेअर बाजारात ४०० टक्के नफ्याचं आमिष दाखवलं आणि पुण्यातील महिलेने एका जाहिरातीवर क्लिक केलं! मात्र, हेच क्लिक तिला ३२ लाख ३० हजार रुपयांना महागात पडलं. खासगी ॲप आणि सोशल मीडिया ग्रुपच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचा आरोप आहे. 'मीना राजपूत' नावामागे नेमकं कोण आहे? नऱ्हे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 19, 2026 | 03:21 PM
image

image

Follow Us
Follow Us:
  • ४००% नफ्याचे आमिष; ३२.३० लाखांचा गंडा
  • सोशल मीडिया जाहिरातीतून फसवणूक
  • ‘मीना राजपूत’च्या नावामागे कोण? पोलिसांचा तपास

पुणे : शेअर बाजारात तब्बल ४०० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नऱ्हे परिसरातील एका ४१ वर्षीय महिलेची ३२ लाख ३० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. सोशल मीडियावरील आकर्षक जाहिरातीला बळी पडल्याने महिलेचे मोठे आर्थिक नुकसान झाले. याप्रकरणी पीडित महिलेने नऱ्हे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सोशल मीडिया जाहिरातीद्वारे संपर्क

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला नऱ्हे येथील गोल्ड अंबर सोसायटीमध्ये राहते. तिने सोशल मीडियावर शेअर ट्रेडिंगसंदर्भातील एक जाहिरात पाहिली होती. या जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर ‘मीना राजपूत’ नावाच्या संशयित महिलेने तिला एका खासगी सोशल मीडिया ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. या ग्रुपमध्ये शेअर बाजार आणि आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठा परतावा मिळू शकतो, असे सांगण्यात आले. एका खासगी ॲपच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास तब्बल ४०० टक्के नफा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे तक्रारदार महिलेचा संबंधित व्यक्तींवर विश्वास बसला.

३२ लाख गुंतवले; परतावा मिळाला नाही

मोठ्या नफ्याच्या अपेक्षेने महिलेने संबंधित ॲपमध्ये टप्प्याटप्प्याने एकूण ३२ लाख ३० हजार रुपये गुंतवले. मात्र, एवढी मोठी रक्कम गुंतवूनही तिला अपेक्षित परतावा मिळाला नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.

हेही वाचा: NEET विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा! खेळण्यातील बंदुकीच्या बटाने डोक्यावर वार; अन् विद्यार्थी…

‘मीना राजपूत’च्या नावामागे कोण?

या प्रकरणी नऱ्हे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘मीना राजपूत’ या नावाने संपर्क साधणारी व्यक्ती कोण आहे, तसेच या फसवणुकीत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, सोशल मीडियावर मोठ्या आणि हमखास परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या जाहिरातींपासून नागरिकांनी सावध राहावे. कोणत्याही अनोळखी ॲपमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी त्याची विश्वासार्हता तपासावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुण्यातील महिलेची किती रुपयांची फसवणूक झाली?

    Ans: महिलेची ३२ लाख ३० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची तक्रार आहे.

  • Que: फसवणूक कशा प्रकारे झाली?

    Ans: सोशल मीडियावरील शेअर ट्रेडिंगच्या जाहिरातीद्वारे खासगी ग्रुप आणि ॲपच्या माध्यमातून मोठ्या परताव्याचे आमिष दाखवण्यात आले.

  • Que: शेअर बाजारात ४०० टक्के परतावा देण्याचे आश्वासन विश्वासार्ह असते का?

    Ans: अशा अवास्तव परताव्याच्या हमीपासून सावध राहावे. गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित संस्था आणि ॲपची अधिकृतता तपासावी.

Web Title: Pune narhe share market fraud 32 lakh 400 percent profit sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • cyber crime
  • Cyber Fraud
  • maharashtra. pune crime

संबंधित बातम्या

Bhandara News: बनावट दस्तऐवज सादर करून लाखोंची फसवणूक! दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; सायबर गुन्ह्याची कारवाई
1

Bhandara News: बनावट दस्तऐवज सादर करून लाखोंची फसवणूक! दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; सायबर गुन्ह्याची कारवाई

धक्कादायक ! सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार, ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
2

धक्कादायक ! सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार, ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

Crime News: नाशिकमध्ये बाल लैंगिक शोषणाचे २५० व्हिडिओ व्हायरल; दीड वर्षांपासून सुरू होता प्रकार…
3

Crime News: नाशिकमध्ये बाल लैंगिक शोषणाचे २५० व्हिडिओ व्हायरल; दीड वर्षांपासून सुरू होता प्रकार…

Pune Crime News: वाद दोन जणांचा, बळी तिसऱ्याचा; तीन लाखांच्या वादात तरुणाचा रक्तरंजित अंत
4

Pune Crime News: वाद दोन जणांचा, बळी तिसऱ्याचा; तीन लाखांच्या वादात तरुणाचा रक्तरंजित अंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.