crime (फोटो सौजन्य: social media)
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘तू खूप क्यूट आहेस, आपण फिरायला जाऊ,’ असे म्हणत स्कूल बसचालकाने 9 वर्षांच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. आईवडिलांना घरी येणास उशीर होईल असे सांग, असे म्हणत आरोपीने तिचा विनयभंग केला. हा संतापजनक प्रकार कामगार चौक ते जय भवानीनगर मार्गावरील एका स्कूल बसमध्ये घडला आहे. याप्रकरणी स्कूल बसचालक विरोधात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आरोपीच नाव गणेश संपत म्हस्के असे आहे.
नेमके काय घडलं?
पीडित ९ वर्षाची मुलगी ही इंग्रजी शाळेत शिकते. ती शाळेत ३ वर्षांपासून गणेशच्या व्हॅनने जाते. ३० जुलैला दुपारी २ वाजता व्हॅनमधील सर्व मुले उतरल्यानंतर घरापासून काही अंतरावर व्हॅन थांबवत गणेशने तिचा हात पकडला. तू खूप क्युट आहेस, उद्या आपण दोघे फिरायला बाहेर जाऊ, तू घरी तुझ्या आई वडिलांना सांग शाळेतून येण्यास उशीर होणार आहे, असे म्हणाला. घरी गेलेली मुलगी दिवसभर शांत होती. त्यामुळे आईवडिलांना संशय आला. रात्री १० वाजता आईने विश्वासात घेतलं आणि पीडित मुलीने गणेशच्या कृत्याविषयी सांगितले. त्यानंतर सदर मुलीच्या आईवडिलांनी तात्काळ शाळेला या प्रकरणाची माहिती दिली आणि मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिथे तक्रार दाखल केली असून पोलीस अधिक तपास करत आहे.
प्रेमाच्या जाळ्यात ओढून आजारपणात शरीरसंबंध, २ वेळा केला गर्भपात आणि मारहाण; एका वकिलाविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधून धक्कदायक घटना समोर आली आहे. एका २७ वर्षीय महिलेची ओळख करून तिला आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि शरीर संबंध ठेवण्यासाठी वारंवार मारहाण आणि लैंगिक शोषण एका वकिलाने केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेचा दोन वेळा गर्भपात करण्यात आलं असून लग्नाचं विषय काढल्यानंतर पीडित महिलेला गाडीने उडवण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पीडित महिलेने आरोपी वकिला विरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी वकिलाचे नाव महेंद्र भगवान नैनाव ३४ वर्षीय असे आहे. महिला आपल्या पतीपासून वेगळी राहते. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान महिलेची आरोपी वकिलाशी ओळख झाली. आरोपीने संपर्क वाढवून ओळख वाढवली. महिलेला लग्नाचा आमिष देऊन प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध ठेवले. आजारपणातही शरीर संबंध ठेवण्यास आरोपीने तरुणीला भाग पाडलं असे गंभीर आरोप महिलेने केले आहे.