कोल्हापुरात मुख्याध्यापकाने विहिरीत उडी घेऊन संपवलं जीवन, शिक्षणक्षेत्रात खळबळ
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरामध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे. कागल नगरपालिकेच्या शाळेत कार्यरत असलेले मुख्याध्यापक मारुती व्हरकट यांनी विहिरीत उडी घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
Kalyan Crime : कार डिलींगच्या नावाखाली ड्रग्जची तस्करी, हैद्राबाद विमानतळावरुन रहिम शेखला अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हरकट यांचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी व अग्निशमन विभागाच्या जवानांच्या मदतीने घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
धक्कादायक! जबरदस्तीने मित्राला लिंगबदल करण्यास भाग पाडून बलात्कार, १० लाख दिले नाही तर आयुष्य…..
मुख्याध्यापक व्हरकट कर्तव्यदक्ष, शांत स्वभावाचे आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते, अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली. त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यांच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, राज्यात शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित आत्महत्यांचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब ठरत आहे.