कार डिलींगच्या नावाखाली ड्रग्जची तस्करी, हैद्राबाद विमानतळावरुन रहिम शेखला अटक
राज्यात होत असलेल्या ड्रग्सच्या तस्करीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून राज्यात ड्रग्सची तस्करी खपवून घेतली जाणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या प्रकरणी मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यातील ड्रग्सची पाळंमुळं खोदून काढण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललण्याने ड्रग्स तस्करांचे धाबे चांगलेच दणाणार आहेत. याचदरम्यान काही दिवसापूर्वी डोंबिवली लोढा पलावा येथील हाय प्रोफाईल सोसायटीतून दोन किलो एमडी ड्रग्ज ज्याची किंमत २ कोटी रुपये होती. ड्रग्ज जप्त करत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती. या प्रकरणात आत्ता ड्रग्ज तस्करीचा म्होरक्या मोहम्मद रहिम सलीम शेख याला हैद्राबाद येथील विमानतळावरुन अटक केली आहे.
आरोपी रहिम शेख हा बेहरीन येथे पळून जाण्याच्या तयारीत होता. मुंब्रा येथे कार डिलीर म्हणून त्याची ओळख आहे. कार डिलींगच्या नावाखाली खरा धंदा ड्रग्जचा करीत होता. सारखा तो परदेश वारी करीत होता. नक्की तो परदेशात कशासाठी जात होता. याचा देखील पोलिसांनी तपास सुरु केला आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
काही दिवसापूर्वी डोंबिवली येथील लोढा पलावा येथील डाऊन टाऊन या हाय प्रोफाईल सोसायटीतील एका फ्लॅटवर छापा टाकण्यात आला. यावेळी मानपाडा पोलिसांनी २ किलो एमडी ड्रग्ज जप्त केली असून या ड्रग्जची किंमत २ कोटी रुपये होती. या प्रकरणात अशिल सुर्वे, मोहम्मद इशा कुरेशी आणि एक १९ वर्षीय तरुणी मेहर देवजानी या तिघांना अटक केली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज जप्त केल्यानंतर कल्याणचे डिपीसी अतुल झेंडे यांनी या प्रकरणातील मुख्य म्होरक्याला शोधण्यासाठी तपास पथके नेमली आहेत. अखेर पोलिसांना यश आले.
मोहम्मद रहिम सलीम शेख या ड्रग्ज डिलीरला हैद्राबाद विमान तळावरून अटक करण्यात आली. मोहम्मद रहिम हा बेहरीन जाण्याच्या तयारीत होता. त्या आधीच त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळ्या आहेत. डिपीसी अतुल झेंडे यांनी सांगितले की, मोहम्मद रहिम हा ड्रग्ज तस्करीचा म्होरक्या आहे. मुंब्रा येथे कार डिलींगचा व्यवसाय करतो. सारखा तो परदेशात ये जा करतो. नक्की तो परदेशात कशासाठी ये जा करतो याचा देखील तपास सुरु आहे. आणखीन किती लोक मोहम्मद रहिम शेख याच्या रॅकेटमध्ये सहभागी आहेत. त्याचाही तपास सुरु आहे. हे अंमली पदार्थ घेणारे ग्राहक कोण होते. ते कशा प्रकारे विकायचे याबाबतही माहिती तपासा अंती समोर येणार आहे. रहिम हा त्याच्या भाऊ आणि आई सोबत मुंब्रा येथे राहतो. त्याच्या बँक अकाऊंटमध्ये लाखो रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.